उन्नाव बलात्कार प्रकरण : सीबीआयच्या आरोपपत्रात भाजपा आमदारासह इतरांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 09:27 PM2018-07-11T21:27:58+5:302018-07-11T21:28:07+5:30

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयनं आज भाजपा आमदार कुलदीप सेन सेंगरसह इतरांच्या नावांचा समावेश असलेलं आरोपपत्र दाखल केलं आहे.

Unnao rape case: CBI chargesheet includes BJP MLAs and others | उन्नाव बलात्कार प्रकरण : सीबीआयच्या आरोपपत्रात भाजपा आमदारासह इतरांचा समावेश 

उन्नाव बलात्कार प्रकरण : सीबीआयच्या आरोपपत्रात भाजपा आमदारासह इतरांचा समावेश 

Next

लखनऊ- उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयनं आज भाजपा आमदार कुलदीप सेन सेंगरसह इतरांच्या नावांचा समावेश असलेलं आरोपपत्र दाखल केलं आहे. कुलदीपनं पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात सीबीआयने पहिले आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये सेंगरचा भाऊ जयदीप सिंह याच्यासह पाच आरोपींच्या नावाचा समावेश होता.

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात गेल्या काही दिवसांपूर्वीच सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखलदेखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं.
नेमके काय आहे प्रकरण?  
भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.  

आयोगाची सरकारला नोटीस
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

भाजपा आमदाराच्या भावाला अटक
युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंह व अतुलसिंह या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.

Web Title: Unnao rape case: CBI chargesheet includes BJP MLAs and others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.