उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 09:24 AM2018-04-12T09:24:27+5:302018-04-12T09:26:47+5:30

उन्नावमधील युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Unnao rape case: FIR was registered against BJP MLA Kuldeep Singh Senger | उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

Next

लखनौ - उन्नावमधील युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर बुधवारी रात्री एसएसपींच्या निवासस्थानावरून आत्मसमर्पण न करताच माघारी परतले होते.  

या सामूहिक बलात्कार प्रकरणात कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात भादंवि कलम 363, 366, 376 आणि 506 तसेच पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेनगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  उन्नाव येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर बुधवारी रात्री आत्मसमर्पण करणास असल्याचे वृत्त आले होते. मात्र प्रत्यक्षात ते आत्मसमर्पण न करताच ते एसएसपींच्या निवासस्थानातून माघारी परतले. मात्र एसएसपी हे उपस्थित नसल्याने आपण माघारी जात असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 





 दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या वडलांच्या मृत्युप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीने दिलेल्या अहवालाच्या आधारावर सरकारने आमदार आणि अन्य संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. "मात्र आपण आरोपी नसून, मी बलात्कार केलेला नाही. माझ्याविरोधात अपप्रचार केला जात आहे," असा दावा सेंगर यांनी केला होता.  

 नेमके काय आहे प्रकरण?  
भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप युवतीने केला आहे. युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.  

आयोगाची सरकारला नोटीस
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

भाजपा आमदाराच्या भावाला अटक
युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंग व अतुलसिंग या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.

Web Title: Unnao rape case: FIR was registered against BJP MLA Kuldeep Singh Senger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.