Unnao Rape Case : भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर सीबीआयच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 07:32 AM2018-04-13T07:32:42+5:302018-04-13T09:39:12+5:30

उन्नावमध्ये 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंग सेनगर याला ताब्यात घेतले

Unnao Rrape Case : BJP MLA Kuldeep Singh Senger has been detained by CBI | Unnao Rape Case : भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर सीबीआयच्या जाळ्यात

Unnao Rape Case : भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर सीबीआयच्या जाळ्यात

Next

लखनऊ - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगर याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखलदेखील करण्यात आले आहेत, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सीबीआयने पहाटे 4.30 वाजता ही कारवाई केली आहे. सीबीआयच्या लखनऊ कार्यालयात कुलदीप सिंह सेनगरची चौकशी सुरू आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. 

नेमके काय आहे प्रकरण?  
भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.  

आयोगाची सरकारला नोटीस
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

भाजपा आमदाराच्या भावाला अटक
युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंह व अतुलसिंह या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.



 




 

Web Title: Unnao Rrape Case : BJP MLA Kuldeep Singh Senger has been detained by CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.