उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना योगी सरकार वाचवतंय- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 08:46 PM2019-12-06T20:46:41+5:302019-12-06T20:47:10+5:30

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी देशात होत असलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

Unnav gang rape case; Yogi government is saving the accused - Priyanka Gandhi | उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना योगी सरकार वाचवतंय- प्रियंका गांधी

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना योगी सरकार वाचवतंय- प्रियंका गांधी

googlenewsNext

नवी दिल्लीः काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी देशात होत असलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.  केंद्र आणि राज्य सरकारांना लक्ष्य करत बलात्कारातील आरोपींना सरकार वाचवत असल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केला आहे. आता महिलांना असुरक्षितता वाटत आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
  
उन्नाव प्रकरणातही एफआयआर दाखल करण्यासाठी चार महिने लागले होते. सरकार महिलांच्या बाजूनं आहे की आरोपींच्या बाजूनं हे त्यांना ठरवावं लागणार आहे. आम्ही महिलांसाठी लढत राहू, समाजात महिलांना सत्ता मिळाली पाहिजे. मी माझ्या बहिणींना सांगत असते की पुरुषांकडून सत्ता खेचून घ्या, पंचायतच्या निवडणुका लढा, विधानसभेच्या निवडणुका लढा, पुढे जा आणि राजकारणात या, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडल्यास आपण स्वतःला वाचवू शकता. कायदा पारदर्शक आहे. निर्भया प्रकरणानंतर कायदा कडक करण्यात आला आहे. जलद गती न्यायालयाचेही काही कायदे प्रस्तावित असून, ते लागू करण्यात आले पाहिजेत.


जर एखाद्या महिलेवर अत्याचार झालेला असेल आणि 4 महिन्यांपर्यंत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झालेलं नाही, कोणतीही कारवाई नाही, आरोपी दोन महिन्यांनी जामिनावर सुटतात. अशात आपण कायदा-सुव्यवस्था लागू करू शकत नाही. हैदराबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच आरोपींना अटक करण्यात आली होती.
पीडितेच्या हत्येप्रकरणी पोस्ट मॉर्टेम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले होते. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियंकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून, ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.  

पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली, तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्या वेळाने कॉल करते असं सांगून पीडितेने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.

Web Title: Unnav gang rape case; Yogi government is saving the accused - Priyanka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.