शेवटपर्यंत राष्ट्राचाच विचार

By Admin | Published: July 29, 2015 02:44 AM2015-07-29T02:44:24+5:302015-07-29T02:44:24+5:30

आयआयएम शिलाँगमधील कार्यक्रमात सहभागी होेण्यासाठी डॉ. कलाम विमानाने गुवाहाटीला जाण्यासाठी निघाले. सोबत मी होतो. ते १ए तर मी शेजारच्या १सी आसनावर. गडद विटकरी

Until the end, the nation thought about it | शेवटपर्यंत राष्ट्राचाच विचार

शेवटपर्यंत राष्ट्राचाच विचार

googlenewsNext

सृजनपाल सिंग : डॉ. कलाम यांच्या अखेरच्या क्षणांचे सोबती

नवी दिल्ली : आयआयएम शिलाँगमधील कार्यक्रमात सहभागी होेण्यासाठी डॉ. कलाम विमानाने गुवाहाटीला जाण्यासाठी निघाले. सोबत मी होतो. ते १ए तर मी शेजारच्या १सी आसनावर. गडद विटकरी रंगाच्या सूटमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व आणखी खुलले होते. हा रंग छान आहे, हे वाक्य उच्चारताना हा त्यांच्या अंगावर परिधान झालेला शेवटचा रंग असेल, हे ध्यानीमनीही नव्हते. पावसाळी हवामानामुळे विमान हेलकावे खाऊ लागताच माझा जीव वर-खाली होतोय हे जाणवताच त्यांनी त्यांच्या खास शैलीत त्यावर उपाय काढला. अशावेळी ते खिडकीची झडप बंद करून म्हणायचे, आता भीती तुला दिसणार नाही!
शिलाँगपर्यंतचा अडीच तासांच्या प्रवासात डॉ. कलम अनेक विषयांवर भरभरून बोलले. सकाळी पंजाबात गुरुदासपूरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. प्रदुषणाप्रमाणेच मानवाने केलेल्या शक्तीच पृथ्वीवरील मानवतेला मोठा धोका ठरणार आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ठप्प झालेल्या संसदेबद्दलही त्यांनी मत व्यक्त केले. मी दोन सरकारांचे कामकाज पाहिले आहे, त्यानंतरही मी बघतो आहे. अशा प्रकारचे अडथळे येत राहतात, हे बरोबर नाही. याबाबत काहीतरी उपाय करायला हवा आणि विकासात्मक कामावर संसद चर्चा करेल असा तोडगा काढायला हवा असे ते म्हणाले. आयआयएमच्या विद्यार्थ्यांना संसद विना अडथळा कशी चालू शकेल यावर विचार करायला सांगणारी सरप्राईज असाइन्मेंट देण्याचा आपला खास कलाम प्लॅन ही त्यांनी सांगितला. पण थोड्यावेळाने ते हसून म्हणाले, मीच जर यावर उत्तर शोधू शकत नाही तर विद्यार्थ्यांना मी हे कसे सांगू शकेन? अशा प्रकारे वाटेमध्ये त्यांचे राष्ट्रीय विचारांवर सतत विचार व चर्चा चालू होती.

प्रोटोकॉल आणि संवेदनशीलता
गुवाहाटीला उतरल्यानंतर डॉ. कलाम यांचा सहा ते सात गाड्यांचा ताफा शिलाँगच्या दिशेने जाऊ लागला. सर्वात प्रथम एक सुरक्षेसाठी आणि दिशादर्शक अशी जिप्सी होती, त्यामध्ये तीन जवान होते. त्यातील एक रायफलधारी जवान प्रवासात कायम उभा असल्याचे पाहताच कलाम यांनी तो का उभा राहिला आहे असे विचारले ?, ह्यतो दमणार नाही का?, ही शिक्षाच आहेह्ण असे सांगून त्याला वायरलेस संदेश पाठवून बसण्याची विनंती करण्यास सांगितले.
त्याला आपल्या संरक्षणासाठी उभे राहण्याच्या आज्ञा असाव्यात असे उत्तर देऊन कसेबसे त्यांना समजावले. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. पुढच्या दीड तासाच्या प्रवासात कलाम यांनी तीनदा, त्याला बसण्यासाठी संदेश पाठविता येईल का अशी विचारणा केली. मात्र त्यामध्ये काहीच हस्तक्षेप करता येत नाही हे दिसल्यावर कलाम यांनी, ह्यमला त्याला धन्यवाद द्यायचे आहेतह्ण असे सांगितले.
आणि शिलाँगला उतरल्यावर त्यांनी खरेच त्या जवानास बोलावून त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि म्हणाले, दमला आहेस का तू? तुला काही खायला हवे आहे का? माझ्यामुळे तुला उभे राहावे लागल्याबद्दल माफ कर.ह्ण माजी राष्ट्रपतींचे हे बोलणे ऐकून भारावलेल्या जवानाने ह्यसर, आम्ही तुमच्यासाठी सहा ताससुद्धा उभे राहायला तयार आहोतह्ण अशा शब्दांमध्ये कृतज्ञता व्यक्त केली.

रविवारीही काम करून आगळी आदरांजली
केरळच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या राज्य महिला विकास महामंडळाने (केएसडब्ल्यूडीसी) रविवारी २ आॅगस्ट रोजी काम करून डॉ. कलामांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्या मृत्यूनंतर सुटी जाहीर केली जाऊ नये; उलट एक दिवस अतिरिक्त काम केले जावे, अशी इच्छा कलाम यांनी व्यक्त केली होती, ती पूर्ण करताना आम्ही रविवारीही काम करणार आहोत, असे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पीटीएम सुनीश यांनी सांगितले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शासकीय शाळांच्या अभ्यासक्रमात कलाम यांच्या जीवनावर पाठ समाविष्ट करणार असल्याचे सांगितले.

टिष्ट्वटरवर कायम राहणार
डॉ. कलाम यांचे निधन झाले असले तरी ते ह्यइन मेमरी आॅफ डॉ. कलामह्ण या टष्ट्वीटर हँडलरद्वारे कायम राहणार आहेत. डॉ. कलाम यांच्या चिरंतन आठवणींना अर्पित या अकाऊंटमधून त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि ध्येय याबाबत लिहिले जाईल असे टिष्ट्वट कलाम यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे सल्लागार सृजनपाल सिंग यांनी केले आहे.

सृजनपाल सिंग यांच्याबद्दल..
सृजनपाल सिंग हे लेखक असून ते आयआयएमएमधून सुवर्णपदक घेऊन उत्तीर्ण झाले होते. सिंग यांनी अ‍ॅडव्हांटेज इंडिया या ग्रंथासाठी डॉ. कलाम यांच्याबरोबर सहलेखकाचे काम केले आहे. कालांतराने ते डॉ. कलाम यांचे जणू सांगाती बनले. कलाम यांच्या निधनानंतर सिंग यांनी लागलीच तयार केलेल्या ह्यकलाम सर ह्य या हॅशटॅगवर लाखो फॉलोअर्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिंग यांनीही अनेक आठवणी तेथे नमूद केल्या आहेत.

Web Title: Until the end, the nation thought about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.