खाजगी रूग्णालयांमध्ये अप्रशिक्षीत स्टाफ
By admin | Published: July 20, 2016 11:49 PM2016-07-20T23:49:07+5:302016-07-20T23:49:07+5:30
भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी शहरातील खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम (दवाखाने) किती व त्यातील नोंदणीकृत (प्रशिक्षीत) स्टाफ किती? अशी विचारणा केली. त्यावर प्रशासनाकडून ३३९ खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम्स असून स्टाफबाबत तपासणी गेल्या वर्षभरात आरोग्याधिकारीपदी तज्ज्ञ अधिकारी नसल्याने तपासणी झाली नसल्याचे सांगण्यात आले. आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दहा महिने आपण नसल्याने तपासणी केलेली नसल्याचे सांगितले. त्यावर रमेशदादांनी मनपाच्या अखत्यारितील हा विषय नसल्याचे सांगितले. अखेर महापौरांनी आरोग्याधिकार्यांना याबाबतचे अधिकार आहेत का? याची माहिती घेऊन अधिकार असल्यास सर्व दवाखान्यांची तपासणी करून अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश दिले.
Next
भ जपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी शहरातील खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम (दवाखाने) किती व त्यातील नोंदणीकृत (प्रशिक्षीत) स्टाफ किती? अशी विचारणा केली. त्यावर प्रशासनाकडून ३३९ खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम्स असून स्टाफबाबत तपासणी गेल्या वर्षभरात आरोग्याधिकारीपदी तज्ज्ञ अधिकारी नसल्याने तपासणी झाली नसल्याचे सांगण्यात आले. आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दहा महिने आपण नसल्याने तपासणी केलेली नसल्याचे सांगितले. त्यावर रमेशदादांनी मनपाच्या अखत्यारितील हा विषय नसल्याचे सांगितले. अखेर महापौरांनी आरोग्याधिकार्यांना याबाबतचे अधिकार आहेत का? याची माहिती घेऊन अधिकार असल्यास सर्व दवाखान्यांची तपासणी करून अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश दिले. गिरणा व दापोरा पंपींगबाबत होणार निर्णयभाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे यांनी गिरणा पंपींग, दापोरा पंपीग, सावखेडा जलशुद्धीकरण केंद्र या योजना बंद आहेत. तेथील स्थावर मिळकत व मशिनरी तेथे असलेले कर्मचारी याबाबत काय कार्यवाही केली? अशी विचारणा केली. त्यावर ही मशिनरी पडून असल्याचे तसेच देखरेखीसाठी काही कर्मचारी नियुक्त असल्याचे सांगण्यात आले. त्यावर महापौरांनी याबाबत मजिप्राशी चर्चा करून पुढील महासभेत मशिनरीबाबत व तेथील जागांबाबतचा प्रस्ताव सादर करावा. जेणेकरून त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेता येईल, असे स्पष्ट केले. विद्यार्थी वाहतुकीबाबत शाळांना देणार पत्रमनसेचे अनंत जोशी यांनी शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या रिक्षा, वाहने हे रस्त्ययावरच उभी केली जातात. तेथूनच विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. त्यामुळे एखादवेळी गंभीर अपघात होण्याची भिती आहे. त्यामुळे या शाळांनी त्यांच्या आवारात ही वाहने उभी राहण्याची व्यवस्था करण्याबाबत पत्र देण्याची मागणी केली. त्यानुसार महापौरांनी कार्यवाहीचे आदेश संबंधीतांना दिले.