मोदींच्या हस्ते भगवान शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण

By admin | Published: February 24, 2017 08:30 PM2017-02-24T20:30:57+5:302017-02-24T21:44:50+5:30

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर येथील ईशा योग केंद्रात भगवान शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

The unveiling of 112-feet tall statue of Lord Shiva at the hands of Modi | मोदींच्या हस्ते भगवान शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण

मोदींच्या हस्ते भगवान शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण

Next
ऑनलाइन लोकमत
कोईम्बतूर, दि. 24 - महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर येथील ईशा योग केंद्रात भगवान शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. 
यावेळी ईशा फाउंडेशनचे संस्थापक योगगुरु जग्गी वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी आणि भाविक उपस्थित होते. भारताने जगाला योगाची भेट दिली आहे. योगामुळे एकात्मतेची भावना निर्माण होते. एखादी संकल्पना केवळ ती प्राचीन आहे म्हणून नाकारणे घातक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.  
ईशा फाउंडेशनतर्फे भगवान शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीची उभारणी करण्यात आली आहे. ही मूर्ती दगडाऐवजी स्टीलचे तुकडे जोडून तयार करण्यात आली आहे. तसेच, येथील नंदीची मूर्तीही तिळाचे बी, हळद, भस्म आणि रेती तसेच मातीपासून बनविण्यात आली आहे. 

Web Title: The unveiling of 112-feet tall statue of Lord Shiva at the hands of Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.