मादाम तुसाँ संग्रहालयात आज मोदींच्या मेणाच्या पुतळयाचे अनावरण
By admin | Published: April 28, 2016 10:23 AM2016-04-28T10:23:07+5:302016-04-28T10:29:01+5:30
लंडनमधील जगप्रिसद्ध मादाम तुसाँ संग्रहालयातील जागतिक नेत्यांच्या पंकत्तीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - लंडनमधील जगप्रिसद्ध मादाम तुसाँ संग्रहालयातील जागतिक नेत्यांच्या पंकत्तीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश होणार आहे. मादाम तुसाँच्या टीमने बनवलेल्या मोदींच्या मेणाच्या पुतळयाचे लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयात आज अनावरण होणार आहे.
मागच्या आठवडयात सिंगापूर, हॉंगकॉंग आणि बँकॉकमधील मादात तुसाँ संग्रहालयात मोदींच्या पुतळयाचे अनावरण झाले. लंडनला हा पुतळा नेण्याआधी मोदींना हा पुतळा दाखवण्यात आला. त्यावेळी ब्रह्मदेव जे काम नेहमी करतो ते निर्माणाचं काम या कलाकारांनी केलंय असं ते म्हणाले.
खादीचा कुडता आणि त्यावर जॅकेट घातलेले मोदी राजकीय सभांमध्ये उपस्थित जनसमुदायाला ज्या पद्धतीने नमस्कार करतात तीच पोझ या मेणाच्या पुतळयाची आहे. प्रसिद्ध जागतिक नेते आणि बॉलिवूड कलाकारांचे मेणाचे पुतळे या म्युझियममध्ये आहेत.