वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:24 AM2018-10-30T04:24:36+5:302018-10-30T04:25:17+5:30
सर्व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेल्या ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ पुतळ्याच्या अनावरणाला सर्व मुख्यमंत्र्यांनी हजर राहावे, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करीत आहेत. हा समारंभ ३१ आॅक्टोबर रोजी होईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यास न जाण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार, के. सी. आर. पलानीस्वामी उपस्थित असावेत, असे मोदी यांना वाटते. परंतु, नितीश कुमार उत्सुक नाहीत. तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, ओदिशाचे नवीन पटनाईक व तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उपस्थित राहावे यासाठीही प्रयत्न होत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य व प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राम मंदिर चळवळीत आम्ही व्यग्र आहोत.’
२३८९ कोटी खर्च
हा जगातील सर्वात उंच पुतळा असून समुद्रसपाटीपासून १९३ मीटर उंचीवर त्याची गॅलरी आहे. गॅलरीत एकावेळी २०० लोक सामावू शकतात.
नर्मदा नदीवरील या पुतळ्यासाठी ३,४०० मजूर आणि २५० अभियंत्यांनी काम केले आहे. २३८९ कोटी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला.