तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:39 IST2025-04-20T12:39:02+5:302025-04-20T12:39:28+5:30
बदायूमध्ये मुलीच्या सासऱ्यासोबतच मुलीची आई पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नातेसंबंधांना धाब्यावर बसवून प्रेमसंबंधांना उत आला आहे.

तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो...
होणारा जावई आणि सासू पळून गेल्याच्या घटनेनंतर आता उत्तर प्रदेशमधून असेच नातेसंबंधातील संबंध आणि पळून जाण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बदायूमध्ये मुलीच्या सासऱ्यासोबतच मुलीची आई पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नातेसंबंधांना धाब्यावर बसवून प्रेमसंबंधांना उत आला आहे.
या महिलेच्या मुलाने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा वडील घराबाहेर जायचे तेव्हा ही महिला तिच्या मुलीच्या सासऱ्यांना काही ना काही कारण सांगून घरी बोलवायची. तसेच ते आले की ती आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवून द्यायची, असा आरोप मुलाने केला आहे. आता ते दोघे कारमध्ये बसून गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
मुलीच्या आईने पोलिसांकडे आपल्या पतीविरोधात तक्रार केली आहे. ममताने सांगितले की ती १५ वर्षांची असताना सुनिलसोबत लग्न झाले होते. सुनिलचे आधी एक लग्न झाले होते. तो दारुडा होता, म्हणून माझ्या भावाला आणि वडिलांना आवडला नव्हता. त्याची पहिली पत्नी नेपाळची होती. तिचा मृत्यू झाला होता. लग्नानंतर सुनिल मला खूप मारायचा तसेच चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे कंटाळून मी मुलीचा सासरा शैलेंद्रसोबत घर सोडून पळून गेले, असे ममताने म्हटले आहे.
तसेच आपला मुलगा अजून लहान आहे, त्याने सुनिलच्या दबावात माझ्यावर आरोप केले आहेत. ते खोटे आहेत, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
पळून गेलेल्या सासू-जावयाचे पुढे काय झाले...
दरम्यान, सासू आणि होणाऱ्या जावयाला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून पकडले असून सासूने पोलिसांना आपण जायवासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपण घरातून केवळ २०० रुपये घेऊन गेले होते, दागिने, पैशांना हातही लावला नाही, ते खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे या महिलेचा पती तिला घटस्फोट देणार नसल्याचे सांगत आहे.