मोठी दुर्घटना! आग्रा येथील मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग; रुग्णांवर रस्त्यावर सुरू केले उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 02:01 PM2022-03-15T14:01:42+5:302022-03-15T14:15:12+5:30

Fire News : आगीची माहिती मिळताच रुग्णालयातील रुग्णांना तातडीने रुग्णालयाबाहेर काढण्यात यश आले आहे.

up agra sn medical college fire super specialty block patient | मोठी दुर्घटना! आग्रा येथील मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग; रुग्णांवर रस्त्यावर सुरू केले उपचार

फोटो - आजतक

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच रुग्णालयातील रुग्णांना तातडीने रुग्णालयाबाहेर काढण्यात यश आले आहे. सध्या त्यांच्यावर रस्त्यावरच उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आह. वेगाने बचावकार्य देखील सुरू करण्यात आलं आहे. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अग्निशमन दलाच्या काही गाड्या रुग्णालय परिसरात दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. चीफ फायर ऑफिसर एआर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेसमेंटमध्ये असलेल्या कचऱ्याला सर्वात आधी आग लागली आणि त्यानंतर सगळा धूर हा रुग्णालयात गेला. यामुळेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नातेवाईक आपल्या रुग्णांना घेऊन बाहेर पळू लागले. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. 

रुग्णालयात जवळपास 20 ते 25 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना आता दुसऱ्या ठिकाणी आता शिफ्ट करण्यात येत आहे. याआधी जम्मूच्या रेजीडेन्सी रोडवर सिंलिंडरच्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शॉर्ट सर्किटमुळे हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Read in English

Web Title: up agra sn medical college fire super specialty block patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.