सासुलाच पळविणाऱ्या, होणाऱ्या जावयाचा रोमँटिक फोटो आला; नवरी भडकली, गिफ्ट दिलेल्या स्मार्टफोनने सूत जुळविले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:44 IST2025-04-10T14:43:50+5:302025-04-10T14:44:15+5:30
लग्न ठरल्यानंतर मुलगी आणि होणार जावई यांच्यात सुर जुळायला हवेत ते सासूनेच आपले सूर जुळविले. या महिलेचा पती देखील अज्ञात राहिला होता. पळून गेल्यावर त्याचेच नाही तर मुलीचे देखील डोळे पांढरे झाले होते.

सासुलाच पळविणाऱ्या, होणाऱ्या जावयाचा रोमँटिक फोटो आला; नवरी भडकली, गिफ्ट दिलेल्या स्मार्टफोनने सूत जुळविले....
मुलीच्या संसाऱ्याच्या स्वप्नांनर स्वार होत मुलीच्याच आईने होणाऱ्या जावयासोबत संसार थाटल्याचा धक्कादायक प्रसंग घडला आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये मुलीच्याच पाठीत खंजीर खुपसणारी आई समोर आली आहे. मुलीला पहायला आला तेव्हाच सासुला जावई आवडला होता. लग्न ठरल्यानंतर मुलगी आणि होणार जावई यांच्यात सुर जुळायला हवेत ते सासूनेच आपले सूर जुळविले. या महिलेचा पती देखील अज्ञात राहिला होता. पळून गेल्यावर त्याचेच नाही तर मुलीचे देखील डोळे पांढरे झाले होते. आता या जावयाचा आणि सासूचा फोटो व्हायरल झाला आहे.
सासुबाईंनी होणाऱ्या जावयावरच दोरे टाकायला सुरुवात केली होती, या काळात तिने जावयाला नवा कोरा मोबाईल देखील घेऊन दिला होता. देण्या-घेण्याचे असते म्हणून ना मुलीला संशय आला ना तिच्या पतीला. पुढे पती बाहेरगावी कामाला असल्याने सासू जावयासोबत फोनवर बोलत असायची. या दोघांच्याच कधी सूत जुळले हे मुलीला आणि पतीला माहिती झाले. पती जेव्हा घरी आला तेव्हा आपली बायको जावयासोबत बोलतेय हे पाहिले होते, परंतू जावईच आहे, त्यात संशय घेण्यासारखे काय असे म्हणून त्यानेही तिकडे कानाडोळा केला होता.
इकडे या दोघांनी मुलीच्या लग्नापू्र्वीच पळून जाण्याचा प्लॅन रंगविला होता. पळून गेल्यावर मुलालादेखील धक्का बसला, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. सासू आणि होणारा जावई कुठे पळून गेले याचा दोघांच्याही घरच्यांना पत्ता नव्हता. अखेर आता त्यांचा फोटो आला आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आपल्या आईला बघून मुलीने संताप व्यक्त केला आहे. शिवानीच्या लग्नाला ९ दिवस असतानाच ते पळून गेले होते. आईने काहीतरी काम आहे असे सांगितले होते, व बाहेर गेली होती. ती परत आलीच नाही. पतीने विचारपूस सुरु केली तेव्हा समजले की होणारा जावई देखील घरातून गायब झाला आहे. मग जे पुढे आले त्यातून दोन्ही कुटुंबे हादरली होती. आता त्यांचा एकत्र फोटो तो देखील सासूची गुलाबी साडी आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र व डोक्यात सिंदूर पाहून सर्वांना धक्का बसला आहे.
पळून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच जावयाचा सासऱ्याला निरोप आला होता, लग्नाला २० वर्षे झाली, तुम्ही तिला खूप त्रास दिला आहे, आता तिला विसरा, असे त्याने या निरोपात म्हटले होते. आता वाच्यता झाल्याने मुलीनेही आई मेली जगली तरी काही फरक पडत नाही, आम्हाला दागिने आणि पैसे परत हवेत, असे म्हटले आहे.