अखिलेश यादवांचा 'आघाडी फॉर्म्युला'; छोट्या पक्षांसोबत मैत्री किती यशस्वी होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:13 PM2022-01-24T12:13:31+5:302022-01-24T12:14:26+5:30

UP Assembly Election 2022 : यंदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी समाजवागी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पुन्हा एकदा रालोदसह छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे.

UP Assembly Election 2022 : Akhilesh Yadav done small parties alliance with Samajwadi Party to win election | अखिलेश यादवांचा 'आघाडी फॉर्म्युला'; छोट्या पक्षांसोबत मैत्री किती यशस्वी होणार? जाणून घ्या...

अखिलेश यादवांचा 'आघाडी फॉर्म्युला'; छोट्या पक्षांसोबत मैत्री किती यशस्वी होणार? जाणून घ्या...

googlenewsNext

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election 2022) राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, नेत्यांची पक्ष बदलण्याची मालिकाही सुरू आहे. 2022 च्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी समाजवागी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पुन्हा एकदा रालोदसह छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे.

अखिलेश यादव यांनी यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बसपा आणि 2017 मध्ये काँग्रेससोबत आघाडी केली होती. बसपा आणि काँग्रेस आघाडीला काही चमत्कार करता आला नाही. दोन्ही निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीला फारसा फायदा झाला नाही. यावेळी समाजवादी पार्टीने छोट्या पक्षांसोबत हातमिळवणी केली आहे.

यादरम्यान समाजवादी पार्टीचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांनी दावा केला आहे की. उत्तर प्रदेशच्या जनतेने ठरवले आहे की 2022 मध्ये समाजवादी पार्टीच्या आघाडीला प्रचंड बहुमताने जिंकून देईल आणि भाजपाचा पराभव करेल. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात लोकांनी ज्या प्रकारे आपल्या प्रियजनांना गमावले आहे, ते जनता विसरलेली नाही.

तसेच, भाजपावर निशाणा साधत अनुराग भदौरिया म्हणाले की, राज्यात महिलांची छेडछाड, शेतकऱ्यांची वाहने पायदळी तुडवली गेली, राज्यात खून, लूट, बलात्काराच्या घटना झपाट्याने वाढल्या. त्याचबरोबर महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ते म्हणाले की, 10 मार्च रोजी यूपीची जनता भाजपाला निरोप देईल.

अखिलेश यादव हे विश्वसनीय सहयोगी नाहीत - भाजपा
दुसरीकडे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले, "अखिलेश यादव हे विश्वसनीय सहयोगी नाहीत." 2017 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला होता, मात्र निवडणुकीनंतर हात मागे घेतला आणि 2019 मध्ये त्यांनी हत्तीला सहयोगी केले. बुवा-बबुआ युतीही निवडणुकीच्या काळातच तुटली. निवडणुकीपूर्वी युतीच्या गाठीही उघडताना दिसत असून अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमनेसामने उभे ठाकल्याचेही ते म्हणाले.

समाजवादी पार्टीला आघाडीचा मर्यादित फायदा
राकेश त्रिपाठी पुढे म्हणाले की, जेव्हा अखिलेश यादव कुटुंबाला सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत. त्याचवेळी, त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी पार्टी सोडली, त्यामुळे अखिलेश विश्वासार्ह सहयोगी असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही. या प्रकरणी लखनऊचे ज्येष्ठ पत्रकार रत्न मणि लाल म्हणतात की, गेल्या काही निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीला लहान-मोठ्या पक्षांसोबत आघाडी करून फायदा झालेला नाही. मात्र, यावेळी समाजवादी पार्टीने केवळ जातीच्या आधारावर युती केली आहे, त्यामुळे त्याचा काही मर्यादित फायदा होऊ शकतो. दरम्यान, 10 मार्चला निकाल जाहीर झाल्यानंतर समाजवादी पार्टी आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

समाजवादी पार्टीसोबत कोण-कोणते पक्ष?
2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अनेक पक्षांशी हातमिळवणी केली आहे. रालोद, सुभासपा, महान दल, प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया), राष्ट्रवादी काँग्रेस, जनवादी पक्ष (समाजवादी), अपना दल (कम्युनिस्ट) प्रमुख आहेत. या निवडणुकीत मागास जातीचे राजकारण करणाऱ्या पक्षांना सोबत घेण्यावर समाजवादी पार्टीचा भर आहे. हे त्यांच्या निवडणूक आघाडीतही दिसून येते. याशिवाय गेल्या आठवड्यात अनेक मंत्री आणि आमदारांनी भाजपा सोडून समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यात सर्वात मागास जातीचे नेते होते.

Web Title: UP Assembly Election 2022 : Akhilesh Yadav done small parties alliance with Samajwadi Party to win election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.