UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशातही 'खेला होबे', ममता बॅनर्जींचा अखिलेश यादवांना जाहीर पाठिंबा; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:53 PM2022-02-08T14:53:18+5:302022-02-08T14:56:23+5:30
UP Assembly Election 2022: लखनौमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींनी अखिलेश यादव यूपीमध्ये 300 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला.
लखनौ: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ममता बॅनर्जींनीअखिलेश यादव यूपीमध्ये 300 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, सपा कार्यकर्त्यांच्या दिशेने फुटबॉल फेकत 'खेल होबे'चा नारा दिला.
#WATCH | Lucknow: West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee throws a football to the public as she holds a press conference with SP chief Akhilesh Yadav, in support to the party for #UttarPradeshElectionspic.twitter.com/aDu0pDjIOr
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 8, 2022
'भाजपने अनेक लोकांचा जीव घेतला'
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्र सरकारने एनआरसीच्या वेळी यूपीमध्ये चकमकीच्या नावाखाली कितीतरी लोकांना मारले. इतिहास बदलण्याचे काम भाजपने केले आहे. भाजपने शहीद ज्योती नष्ट केल्या. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपली राज्यघटना लिहील, आज भाजप त्याच्याशी खेळत आहे. त्या पुढे म्हणाल्या, बनावट चकमकी करुन लोकांना मारण्याची काम भाजपने केले. आज सकाळी ब्राह्मण समाजातील लोक मला भेटायला आले होते. तुम्ही आल्यावर आम्ही अखिलेश यादव यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असे त्यांनी सांगितल्याचे ममता म्हणाल्या.
'मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना ठेचले'
त्या पुढे म्हणतात, आमचे शेतकरी आंदोलन करत होते आणि भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकर्यांना ठेचून मारले. यासाठी भाजपने शेतकऱ्यांची माफी मागावी. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, यूपीमध्ये कोविडमध्ये लोक मरत होते, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री योगी कुठे होता? ज्यांचे मृतदेह तुम्ही गंगेत टाकायला भाग पाडले त्या लोकांच्या कुटुंबीयांची माफी मागा. पीएम मोदी म्हणतात, आम्ही यूपीला पैसे दिले. तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिलेत का? हा सर्व पैसा जनतेचा आहे, असंही त्या म्हणाल्या.
'ममता दीदींचे आभार मानतो'-अखिलेश
तर, यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, 'ममता बॅनर्जी यांनी सत्यमेव जयतेचा आदर्श देशासमोर ठेवला आहे. त्यांनी सर्व जातीयवादी शक्तींना पराभूत करण्याचे काम केले. बंगालमध्ये जी ऐतिहासिक लढाई लढली त्याबद्दल मी ममता दीदींचे आणि बंगालच्या जनतेचे आभार मानतो. आमच्याकडे गंगा-जमुनी तहजीब आहे, ते पुढे नेण्याचे कामही बंगालच्या जनतेने केले.'