UP Assembly Election 2022 Result: भाजपच्या उमेदवाराने नोंदवला मतांचा विक्रम, जाणून घ्या योगींसह या दिग्गज नेत्यांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:55 AM2022-03-11T08:55:34+5:302022-03-11T08:59:03+5:30

UP Assembly Election 2022 Result: भाजपच्या सुनील कुमार शर्मा यांनी निकटच्या प्रतिस्पर्ध्याचा 2,14,835 मतांनी पराभव केला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्यासह 10 पेक्षा अधिक उमेदवारांनी मोठ्या फरकारने विजय नोंदवला आहे.

UP Assembly Election 2022 Result: BJP candidate Sunil Kumar Sharma creates history, won by over 2 lakh votes | UP Assembly Election 2022 Result: भाजपच्या उमेदवाराने नोंदवला मतांचा विक्रम, जाणून घ्या योगींसह या दिग्गज नेत्यांची कामगिरी

UP Assembly Election 2022 Result: भाजपच्या उमेदवाराने नोंदवला मतांचा विक्रम, जाणून घ्या योगींसह या दिग्गज नेत्यांची कामगिरी

Next

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022 Result) योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाने (BJP) बंपर विजय मिळवला आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 273 जागा जिंकण्यात यश आले. गोरखपूरमधून निवडणूक लढवणाऱ्या योगींनी स्वतःच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. तर, साहिबाबादमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या सुनील कुमार शर्मा यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा सर्वाधिक 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव करुन विक्रम केला आहे. उत्तर प्रदेशात 10 हून अधिक उमेदवार आहेत, ज्यांनी एक लाखांहून जास्त मतांनी विजयी नोंदवला आहे. 

सुनील कुमार यांनी नोंदवला विक्रम
साहिबाबादमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सुनील कुमार शर्मा यांनी इतिहास रचला आहे. या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले ते उमेदवार आहेत. भाजपचे सुनील शर्मा यांना 3,22,882 मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सपाचे अमरपाल शर्मा यांना 1,08,047 मते मिळाली. म्हणजेच सुनील कुमार यांनी अमरपाल यांचा 2,14,835 मतांनी पराभव केला आहे.

योगी आदित्यनाथ-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाच्या सुभाती उपेंद्र शुक्ला यांचा 1,03,390 मतांच्या फरकाने पराभव केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, योगी यांना 1,65,499  तर सपा उमेदवार शुभवती शुक्ला यांना 62,109 मते मिळाली.

पंकज सिंह-
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगरच्या नोएडा मतदारसंघातून विजयी झालेले केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा 1.81 लाख मतांनी पराभव केला आहे. पंकज सिंह यांना 2.44 लाख मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभे असलेले सपा उमेदवार सुनील चौधरी यांना केवळ 62,806 मते मिळाली. 

श्रीकांत शर्मा-
योगी सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी मथुरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदीप माथूर यांचा पराभव केला. शर्मा यांनी प्रदीप माथूर यांचा 1,09,809 मतांनी पराभव केला. श्रीकांत शर्मा यांना 1,58,859 तर काँग्रेसचे प्रदीप माथूर यांना 49,056 मते मिळाली.

तेजपाल नागर-
याच गौतम बुद्ध नगरच्या दुसऱ्या जागेवर असलेल्या दादरी येथून भाजपचे उमेदवार तेजपाल नागर यांना 2.18 लाख मते मिळाली, तर सपाचे राजकुमार भाटी यांना 79,850 मते मिळाली. अशा प्रकारे नगर यांनी भाटी यांचा 1.38 लाख मतांनी पराभव केला.

पुरुषोत्तम खंडेलवाल-
तिकडे आग्रा उत्तरमधून भाजपचे पुरुषोत्तम खंडेलवाल यांनी बसपा उमेदवार शब्बीर अब्बास यांचा 1,12,370 मतांनी पराभव केला आहे. खंडेवाल यांना 1,53,817 तर अब्बास यांना 41,447 मते मिळाली.

अतुल गर्ग- 
गाझियाबाद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतुल गर्ग यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार विशाल वर्मा यांचा 1,05,537 मतांनी पराभव केला. अतुल गर्ग यांना 1,50,205 तर विशाल वर्मा यांना 44,668 मते मिळाली.

अंजुला सिंग माहूर-
अंजुला सिंग माहूर यांना भाजपने यूपीच्या हाथरस मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी 1,54,655 मते मिळवली, तर बसपाचे संजीव कुमार यांना 53,799 मते मिळाली. भाजप उमेदवाराने संजीव यांचा 1,00,856 मतांनी पराभव केला.

रामरतन कुशवाह-
भाजपचे उमेदवार रामरतन कुशवाह यांनी ललितपूर जागेवर 1,76,550 मते मिळवून, बहुजन समाज पक्षाचे चंद्रभूषण सिंग बुंदेला उर्फ ​​गुड्डू राजा यांचा 1,07,215 मतांनी पराभव केला.

अमित अग्रवाल-
मेरठ कॅंट जागेवर भाजप उमेदवार अमित अग्रवाल यांनी 1,62,032 मते मिळविली तर SP-RLD युतीच्या उमेदवार मनीषा अहलावत यांचा 1,18,072 मतांच्या फरकाने पराभव केला. मनीषा अहलावत यांना 43,960 मते मिळाली.

मनोहर लाल-
झाशीच्या मेहरौनी जागेवर भाजपचे उमेदवार मनोहर लाल यांनी सुमारे 1 लाख 10 हजारांच्या फरकाने विजय मिळवला आहे. 2022 च्या निवडणुकीत मनोहर लाल यांना 1,84,778 मते मिळाली, तर BSP उमेदवार किरण रमेश खाटिक 74,327 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

Web Title: UP Assembly Election 2022 Result: BJP candidate Sunil Kumar Sharma creates history, won by over 2 lakh votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.