UP Assembly Election 2022 Result : भाजपाला दिली जोरदार टक्कर! 'या' BSP नेत्याने राखला गड; जाणून घ्या, कोण आहे जनतेचा 'रॉबिनहूड'?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 12:41 PM2022-03-11T12:41:37+5:302022-03-11T12:49:15+5:30

UP Assembly Election 2022 Result : निवडणुकीत बहुजन समाज पक्षाची (BSP) कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात बसपाला केवळ एकच जागा जिंकता आली. 

UP Assembly Election 2022 Result bsp mla from rasra lone winner uma shankar singh has image of robin hood up assembly election | UP Assembly Election 2022 Result : भाजपाला दिली जोरदार टक्कर! 'या' BSP नेत्याने राखला गड; जाणून घ्या, कोण आहे जनतेचा 'रॉबिनहूड'?

UP Assembly Election 2022 Result : भाजपाला दिली जोरदार टक्कर! 'या' BSP नेत्याने राखला गड; जाणून घ्या, कोण आहे जनतेचा 'रॉबिनहूड'?

Next

नवी दिल्ली - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशसह 4 राज्यांमध्ये आपली सत्ता राखण्यात यश आले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने दोन रेकॉर्ड बनवले. उत्तराखंडमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर होण्याला भाजपने ब्रेक लावला आणि सगल दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. तर तिकडे उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच एका पक्षाने पूर्ण बहुमताने सत्तेत पुनरागमन केले. पण या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाची (BSP) कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात बसपाला केवळ एकच जागा जिंकता आली. 

रॉबिनहूड म्हणून ओळख असणाऱ्या उमाशंकर सिंह यांनी बसपाकडून एकमेव जागा जिंकली आहे. ते सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. बहुजन समाज पक्षाचे आमदार उमाशंकर सिंह यांनी बलिया जिल्ह्यातील रसडा विधानसभा मतदारसंघातून 87,887 मते मिळवून विजय संपादन केला आहे. त्यांनी भारतीय समाज पक्षाचे (SBSP) उमेदवार सुहेलदेव महेंद्र यांच्यावर 6,583 मतांच्या फरकाने मात केली आहे. सुहेलदेव महेंद्र यांना 81,304 मतं मिळाली आहेत. रसडा विधानसभा मतदारसंघाचे बसपाचे विद्यमान आमदार उमाशंकर सिंह यांनी तिसऱ्यांदा आपली जागा कायम राखली आहे.

उमाशंकर सिंह यांना 'रॉबिनहूड' म्हणून ओळखलं जातं

उमाशंकर सिंह याआधी  रसडा विधानसभा मतदार संघातून 2012 आणि 2017 साली निवडणूक जिंकली होती. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत यूपीमध्ये भाजपला प्रचंड जनसमर्थन मिळालं आहे. अशातही उमाशंकर सिंह आपली जागा जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. खरंतर, रसडा विधानसभा मतदार संघात उमाशंकर सिंह यांना 'रॉबिनहूड' म्हणून ओळखलं जातं. उमाशंकर हे गरिबांच्या मदतीला लगेच धावून येतात. एखाद्या गरीब कुटुबांत मुलीचं लग्न असेल तर त्यांनाही उमाशंकर मदत करत असतात. उमाशंकर सिंह हे व्यवसायाने ठेकेदार आहेत.

सलग तिसऱ्यांदा उमाशंकर सिंह विजयी

2012 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यात ते विजयी झाले. यानंतर 2017 मध्येही त्यांनी आपली आमदारकी कायम राखली. त्यानंतर आता 2022 मध्येही सलग तिसऱ्यांदा उमाशंकर सिंह विजयी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly Election 2022 Result) लढवणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) मोठ्या फरकाने विजयी झाले, पण राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या केशव प्रसाद मौर्य यांना सिरथू विधानसभा मतदारसंघातून पराभचा धक्का बसला. याशिवाय, योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनाही पराभवाची धुळ चाखावी लागली. तिकडे, सपाचे सुप्रीमो अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही आपल्या पहिल्याच निवडणुकीत मोठा विजय मिळवला. 
 

Web Title: UP Assembly Election 2022 Result bsp mla from rasra lone winner uma shankar singh has image of robin hood up assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.