UP Assembly Election 2022 Results : धक्कादायक! मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या गाडीत सापडले हजारो बॅलेट पेपर; सपाने घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:56 AM2022-03-10T08:56:49+5:302022-03-10T09:06:21+5:30

UP Assembly Election 2022 Results : अनेक जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरून समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

UP Assembly Election 2022 Results up election results counting azamgarh unused ballot paper found samajwadi party | UP Assembly Election 2022 Results : धक्कादायक! मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या गाडीत सापडले हजारो बॅलेट पेपर; सपाने घातला गोंधळ

फोटो - आजतक

Next

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजकारणाची पुढील दिशा ठरवण्याची ताकद असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांत जनमत कोणाच्या बाजूने याचे उत्तर आज मिळणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखेल, असा कौल दिला असला तरी प्रत्यक्षात काय निकाल हाती येतात, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर मतदान झाले आहे. सरकार स्थापनेसाठी  २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे. याच दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरून समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असताना आझमगडमध्ये मतमोजणी केंद्राकडे जात असलेल्या एका गाडीत हजारो बॅलेट पेपर सापडले आहेत. हे सापडल्यानंतर आता समाजवादी पार्टीने मोठा गोंधळ घातला आहे. मिळालेल्य़ा माहितीनुसार, आझमगडच्या पाच विधानसभा क्षेत्रातून आलेले ईव्हीएम मशीन बेलईसामधील स्ट्राँग रुममध्ये ठेवली आहे. मात्र बुधवारी रात्री जवळपास दहा वाजता एका पोस्टल बॅलेटच्या एआरओच्या सरकारी वाहनामध्ये काहीही उपयोग नसताना आणले गेलेले बॅलेट पेपर सापडले आहेत. बॅलेट पेपरचा बंडल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

गाडीला घेरलं आणि शिवीगाळ केली सुरू 

बॅलेट पेपर पाहताच समाजवादी पार्टी प्रचंड संतापली आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. गाडीला घेरलं आणि शिवीगाळ सुरू केली. या गोंधळाची महिती मिळताच डीएम अमृत त्रिपाठी व एसपी अनुराग आर्य हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी याचा तपास केला असता हा एआरओचा निष्काळजीपणा असल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचा विजय होईल, असे जनमानस तयार करण्यासाठी एक्झिट पोल तयार करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएमशी छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.

"निवडणूक आयोगाचे अधिकारी ईव्हीएमशी छेडछाड करताहेत"

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अखिलेश यादव यांनी सांगितले की, भाजपा जिंकेल असा मतप्रवाह एक्झिट पोल निर्माण करत आहेत. ही लोकशाहीची शेवटची लढाई आहे. उमेदवारांना न सांगता ईव्हीएम पोहोचवल्या जात आहेत. जर ईव्हीएम अशा प्रकारे नेण्यात येत असतील तर आपल्याल सतर्क राहिले पाहिजे. ही चोरी आहे. आपली मते वाचवण्याची गरज आहे. आम्ही याविरोधात न्यायालयात जाऊ शकतो. मात्र त्यापूर्वी मी लोकांना लोकशाही वाचवण्याचे आवाहन करतो. अखिलेश यादव यांनी पुढे सांगितले की, समाजवादी पक्ष अयोध्येत विजय मिळवणार आहे, त्यामुळेच भाजपा घाबरली आहे. आता निवडणूक आयोगाचे अधिकारी ईव्हीएमशी छेडछाड करत आहेत. सोनभद्रमध्ये सपाच्या नेत्यांनी स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जात असलेल्या सरकारी गाड्या पकडल्या आहेत. त्यामध्ये शिक्का आणि मतपेट्या मिळाल्या आहेत.
 

Web Title: UP Assembly Election 2022 Results up election results counting azamgarh unused ballot paper found samajwadi party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.