UP Assembly Election 2022:नामांकन दाखल करण्यासाठी निघालेल्या सिद्धार्थ नाथ सिंह यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न, विष आणि ब्लेडसह पकडला गेला संशयित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:06 PM2022-02-03T14:06:13+5:302022-02-03T14:07:08+5:30
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या Siddharth Nath Singh यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्ला करण्यासाठी आलेली व्यक्ती सोबत विष आणि ब्लेड घेऊन आली होती.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या सिद्धार्थनाथ सिंह यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्ला करण्यासाठी आलेली व्यक्ती सोबत विष आणि ब्लेड घेऊन आली होती. मात्र त्याने काही आगळीक करण्यापूर्वीच त्याला कार्यकर्ते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले.
या हल्ल्याचा प्रयत्न सिद्धार्थनाथ सिंह हे नामांकन दाखल करण्यासाठी जात असताना घडली. ही घटना मुंडेरा ट्रान्सपोर्टनगर स्थित भाजपा कार्यालयात घडल्याचे सांगण्यात येत आहे. सदर आरोपी हा हल्ला करण्यासाठी मंत्र्यांच्या दिशेने पुढे जात असतानाच त्याला पकडण्यात आले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने मंत्री सिद्धार्थनाथ सिंहने प्रयागराज पश्चिम येथून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. येथे उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
सिद्धार्थनाथ सिंह हे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आहेत. संघटनेमध्ये कार्यकर्त्यापासून ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे.