UP Assembly Election 2022: हीच निवडणूक ठरविणार योगी आदित्यनाथ यांचे केंद्रातील स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 10:24 AM2022-02-03T10:24:33+5:302022-02-03T10:25:59+5:30

UP Assembly Election 2022: पश्चिम उत्तर प्रदेशातील ज्या ५८ मतदारसंघांमध्ये १० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे तो भाग म्हणजे उत्तर प्रदेशचा ग्रीन बेल्ट. गेल्या निवडणुकीत तब्बल ५३ जागा भाजपने एकहाती राखल्या.

UP Assembly Election 2022: This election will decide the position of yogis at the center | UP Assembly Election 2022: हीच निवडणूक ठरविणार योगी आदित्यनाथ यांचे केंद्रातील स्थान

UP Assembly Election 2022: हीच निवडणूक ठरविणार योगी आदित्यनाथ यांचे केंद्रातील स्थान

Next

- गजानन चोपडे
गाझियाबाद : पश्चिम उत्तर प्रदेशातील ज्या ५८ मतदारसंघांमध्ये १० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे तो भाग म्हणजे उत्तर प्रदेशचा ग्रीन बेल्ट. गेल्या निवडणुकीत तब्बल ५३ जागा भाजपने एकहाती राखल्या. त्यामुळे यंदा ही निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे केंद्रातील स्थान ठरविणारी असणार आहे.

पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी ८१५ उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक २७ मथुरा मतदारसंघात आहेत. त्याखालोखाल २३ उमेदवार दिल्लीलगतच्या नोएडातून भाग्य आजमावताहेत. २७० हून अधिक जागांवर ‘कमळ’ फुलणार असल्याचा दावा भाजप गोटातून करण्यात आला आहे. असे झाल्यास हीच बाब योगींच्या पथ्यावर पडून त्यांचा दिल्लीचा मार्ग सुकर होऊ शकतो. 

मोदींनंतर योगी आदित्यनाथ : देशपातळीवर सध्या तरी भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हाच चेहरा आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक स्पष्ट बहुमताने जिंकल्यास योगी भाजपमध्ये क्रमांक दोनचे नेते ठरतील, अशी प्रतिक्रिया गाझियाबाद शहरातील तरुणांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

माहौल बनेगा धीरे धीरे 
नोएडापासून तर गाजियाबादपर्यंत कोणत्याही पक्षाचे कुठेही बॅनर किंवा पोस्टर दिसले नाही. निवडणुकीचे वातावरण नाही. लोकंही उघडपणे बोलत नाही. माहौल बनेगा धीरे धीरे, हे मात्र आवर्जून सांगतात. सेक्टरमध्ये वसलेल्या नोएडात कोरोनाच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावला, व्यवसाय ठप्प झाला. त्याचे पडसाद १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानात उमटतीलही; मात्र त्याचा फटका नेमका कुणाला बसेल, हे आता तरी सांगता येणार नाही. 

काँग्रेसचे मिशन २०२४ 
काँग्रेस पक्ष या निवडणुकीत स्वबळावर लढत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर या पक्षाचा डोळा आहे. त्यामुळे या निवडणुकीत यश मिळाले नाही तरी चालेल; पण किमान पक्षाचा जनाधार वाढेल, कार्यकर्त्यांची फळी निर्माण होईल. 

८२ मध्ये मोबदला, आता झाला महामार्ग
गाझियाबादेतील व्यवसायी अंकुर भारद्वाज सांगतात, विजयनगर ते गाझियाबाद महामार्गासाठी १९८२ साली जमीन अधिग्रहित केली. मोबदलाही मिळाला; पण महामार्गाच्या निर्मितीला ३६ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

Web Title: UP Assembly Election 2022: This election will decide the position of yogis at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.