UP Assembly Election 2022:कुणाचा झेंडा घेऊ हाती? नेत्यांच्या पक्षांतरामुळे कुटुंबांमध्ये भाऊबंदकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 06:16 AM2022-01-30T06:16:09+5:302022-01-30T06:16:54+5:30

UP Assembly Election 2022: राजकारण रक्ताची नातीही पातळ करतात. एकाच घरात दोन वेगवेगळ्या विचारधारेचे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत अनेक घरांमधील हे वास्तव समोर आले आहे.

UP Assembly Election 2022: Whose flag should we take? Brotherhood in families due to defection of leaders | UP Assembly Election 2022:कुणाचा झेंडा घेऊ हाती? नेत्यांच्या पक्षांतरामुळे कुटुंबांमध्ये भाऊबंदकी

UP Assembly Election 2022:कुणाचा झेंडा घेऊ हाती? नेत्यांच्या पक्षांतरामुळे कुटुंबांमध्ये भाऊबंदकी

Next

- सुरेश भुसारी  
नवी दिल्ली : राजकारण रक्ताची नातीही पातळ करतात. एकाच घरात दोन वेगवेगळ्या विचारधारेचे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत अनेक घरांमधील हे वास्तव समोर आले आहे. आता मतदारच ठरवतील, विजयाचा झेंडा कोणाच्या हातात द्यावयाचा.
यात सर्वात अधिक गाजलेले घराणे म्हणजे माजी मुख्यमंत्री नेताजी मुलायम सिंह यादव यांचे. त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांची वहिनी अपर्णा यादव यांनी बंड पुकारून भाजपची उमेदवारी मिळविली. त्या लखनौ कँटमधून उमेदवार आहेत. एवढेच नव्हे अखिलेश यादव यांचे मामा प्रमोद गुप्ता यांनीही भाजपचा आसरा घेतला आहे.

भाऊबंदकी उघड
या निवडणुकीत भाऊबंदकी दिसणार आहे. मसूद कुटुंब हे काँग्रेसचे निष्ठावान घराणे मानले जाते. पश्चिम उत्तर प्रदेशात प्रभाव असलेल्या इमरान मसूद यांनी काँग्रेसला सोडून समाजवादी पार्टीत प्रवेश केला. त्यांचे बंधू नोमान मसूद यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय लोकदलमध्ये प्रवेश केला. दोघेही भाऊ काँग्रेसमधून निघाले; परंतु एका भावाने सपची वाट धरली, तर दुसऱ्याने रालोदला जवळ केले. 

वडील सपात, कन्या भाजपच्या खासदार
बहुजन समाजावर अन्याय होत असल्याचा दावा करीत भाजपला रामराम ठोकणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची कन्या संघमित्रा मौर्य मात्र भाजपच्या बदायूं येथील खासदार आहेत. त्या आता कुणाचा प्रचार करणार हे लवकरच कळणार आहे. परंतु, स्वामी प्रसाद मौर्य यांनी माझी कन्या आपला निर्णय घेण्यास ‘स्वतंत्र’ असल्याचा दावा केला आहे.

पिता व पुत्रींमध्ये द्वंद 
यात पिता व मुलगीसुद्धा आता एकमेकांविरोधात प्रचार करताना दिसणार आहे. भाजपचे आमदार असलेले विनय शाक्य यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला सलाम ठोकला. भाजपने त्यांची कन्या रिया शाक्य यांनाच बिधुनामधून उमेदवारी दिली आहे.

Web Title: UP Assembly Election 2022: Whose flag should we take? Brotherhood in families due to defection of leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.