प्रचारादरम्यान अचानक ढसाढसा रडायला लागल्या भाजपा आमदार, म्हणाल्या...; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 10:10 AM2022-02-03T10:10:03+5:302022-02-03T10:11:29+5:30

BJP Rajni Tiwari And Uttar Pradesh Assembly Elections 2022 : भाजपाच्या आमदार आणि पक्षाच्या उमेदवार रजनी तिवारी एका कार्यक्रमात इतक्या भावूक झाल्या की त्या बोलत असतानाच ढसाढसा रडायला लागल्या. 

UP Assembly Elections 2022 hardoi district shahabad assembly seat BJP Candidate Rajni Tiwari wept | प्रचारादरम्यान अचानक ढसाढसा रडायला लागल्या भाजपा आमदार, म्हणाल्या...; नेमकं काय घडलं? 

प्रचारादरम्यान अचानक ढसाढसा रडायला लागल्या भाजपा आमदार, म्हणाल्या...; नेमकं काय घडलं? 

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Elections 2022) 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 7 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाला आता थोडाच वेळ शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आपलंसं करण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवारही मतदारांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. त्यासाठी रोज नवनवीन पद्धतीही अवलंबल्या जात आहेत. हरदोई जिल्ह्यातील शाहाबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या आमदार आणि पक्षाच्या उमेदवार रजनी तिवारी (BJP Rajni Tiwari) एका कार्यक्रमात इतक्या भावूक झाल्या की त्या बोलत असतानाच ढसाढसा रडायला लागल्या. 

शाहाबाद येथे कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लोकांना संबोधित करताना रजनी तिवारी रडल्या. त्या रडल्या आणि म्हणाल्या की य़ेथे बाहेरचं कोणी बसलेलं नाही. तुम्ही सर्व आमच्या कुटुंबातील सदस्य आहात. येथे बैठक नाही. माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ करा. भविष्यात माझ्याकडून चुका झाल्या तर मला सोडू नका. विरोधकांनी सोशल मीडियावर माझ्याविरोधात लिहिलं तर चालेल, पण स्वत:ची लोकांनी लिहिलं तर ते सहन होत नाही.

"जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी या पक्षात असेन"

रजनी तिवारी म्हणाल्या की, मी बाहेरची नाही. भाजपा हे माझे कुटुंब आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी या पक्षात असेन. स्त्रीचे अश्रू ही कमजोरी नसून ती तिची शक्ती बनतात. तिने जे काही काम करायचे ठरवले ते पूर्ण करते. संपूर्ण कार्यकाळात अनेक विकासकामे केली, जी काही राहिली त्याबद्दल मी माफी मागते. रजनी तिवारी यांनी बीएसपी सोडून 2017 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि शाहाबादमधून निवडणूक जिंकली होती.

403 जागांसाठी होणार मतदान

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत 403 जागांसाठी मतदान होणार आहे. या अंतर्गत 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या विधानसभेची मुदत 15 मे रोजीपर्यंत आहे. 2017 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपला 312 जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीला केवळ 54 जागा मिळू शकल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: UP Assembly Elections 2022 hardoi district shahabad assembly seat BJP Candidate Rajni Tiwari wept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.