सपाने डीसीपी जियाउल हक यांच्या हत्येतील आरोपीला दिली उमेदवारी; पत्नीकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 01:44 PM2022-01-28T13:44:21+5:302022-01-28T14:07:11+5:30

UP Assembly Elections 2022 : 2013 मध्ये डीसीपी जियाउल हक हे प्रतापगडमधील कुंडा येथे तैनात होते. त्यावेळी येथील वादानंतर निर्माण झालेला गोंधळ थांबवण्यासाठी ते गावात पोहोचले असतानाच त्यांची हत्या करण्यात आली होती.

up assembly elections 2022 : wife of co ziaul haq who was killed in pratapgarh protested samajwadi party candidate gulshan yadav from kunda | सपाने डीसीपी जियाउल हक यांच्या हत्येतील आरोपीला दिली उमेदवारी; पत्नीकडून निषेध

सपाने डीसीपी जियाउल हक यांच्या हत्येतील आरोपीला दिली उमेदवारी; पत्नीकडून निषेध

googlenewsNext

कुंडा : दिवंगत डीसीपी जियाउल हक यांच्या पत्नी परवीन आझाद यांनी कुंडा मतदारसंघातून समाजवादी पार्टीने गुलशन यादव यांना उमेदवारी दिल्याचा निषेध केला आहे. दरम्यान, 2013 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा येथे तैनात असलेल्या डीसीपी जियाउल हक यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुलशन यादव यांच्यावर खुनाचा आरोप होता. 

एवढेच नाही तर गुलशन यादव यांच्या व्यतिरिक्त कुंडाचे आमदार आणि माजी मंत्री रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैया यांचेही या प्रकरणात नाव आले होते. त्यामुळे डीसीपी जियाउल हक यांच्या पत्नी परवीन आझाद यांनीही रघुराज प्रताप सिंह यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले आहे आणि लोकशाहीत लोकांमध्ये योग्य आणि निष्पक्ष प्रतिमेचे लोक असायला हवेत, असे म्हटले आहे. 

2013 मध्ये डीसीपी जियाउल हक हे प्रतापगडमधील कुंडा येथे तैनात होते. त्यावेळी येथील वादानंतर निर्माण झालेला गोंधळ थांबवण्यासाठी ते गावात पोहोचले असतानाच त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेमुळे तत्कालीन अखिलेश सरकार हादरले होते. तसेच, रघुराज प्रताप सिंह यांनाही मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

डीसीपी जियाउल हक यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी झाली होती. सीबीआयने रघुराज प्रताप सिंह यांना क्लीन चिट दिली होती. मात्र सीबीआयच्या निर्णयाला परवीन आझाद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात आव्हान दिले होते. आता या प्रकरणी रघुराज प्रताप सिंह विरुद्ध पुन्हा तपास सुरू करण्यात आला आहे.

समाजवादी पार्टीचे गुलशन यादव यांना तिकीट 
समाजवादी पार्टीने कुंडा येथून गुलशन यादव यांना तिकीट दिले आहे. गुलशन यादव हे डीसीपी जियाउल हक प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. गुलशन यादव यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे, रघुराज प्रताप सिंह 1993 पासून या जागेवरून आमदार आहेत. दरम्यान, गुलशन यादव आणि रघुराज प्रताप सिंह एकत्र काम करायचे. मात्र या प्रकरणानंतर दोघे वेगळे झाले. आता ते एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

प्रकरण अद्याप बंद झालेले नाही - परवीन आझाद
डीसीपी जियाउल हक यांच्या पत्नी परवीन आझाद यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण अद्याप बंद झालेला नाही आणि गुलशन यादव यांच्यासारखे लोक निवडणुकीत समोर आहेत. अशा स्थितीत लोकांमध्ये चांगली प्रतिमा असली पाहिजे, कोणाला आमदार करायचे हे प्रतापगडच्या जनतेने ठरवावे. दरम्यान, परवीन आझाद सध्या पोलीस मुख्यालयात ओएसडी म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: up assembly elections 2022 : wife of co ziaul haq who was killed in pratapgarh protested samajwadi party candidate gulshan yadav from kunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.