UP Assembly Result: ED ची नोकरी सोडून निवडणूक लढवली, राजेश्वर सिंह रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 10:14 PM2022-03-12T22:14:44+5:302022-03-12T22:19:43+5:30

भाजपने युपीतील लखनौमधून 9 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

UP Assembly Result: Fighting elections with voluntary retirement from ED, Rajeshwar Singh won by record-breaking votes in lucknow | UP Assembly Result: ED ची नोकरी सोडून निवडणूक लढवली, राजेश्वर सिंह रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

UP Assembly Result: ED ची नोकरी सोडून निवडणूक लढवली, राजेश्वर सिंह रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

googlenewsNext

लखनौ - राज्यातील 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपला मोठं यश मिळालं असून उत्तर प्रदेशमध्ये बहुमताने भाजपचं सरकार आलं आहे. त्यामुळे, योगी आदित्यनाथ लवकरच दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांपैकी 273 जागांवर विजय मिळाला असून अनेक नवे चेहरे यंदा भाजपच्या संसदीय राजकारण दिसणार आहेत.  

भाजपने युपीतील लखनौसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये, एका ईडीतील माजी अधिकाऱ्यालाही तिकीट दिलं होत. राजेश्वर सिंह अस त्या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनीही रेकॉर्डब्रेक विजय मिळवला आहे. सरोजनी नगर मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तब्बल 57 हजारांनी विजय मिळाला आहे. लखनौ मतदारसंघातून आत्तापर्यंत कुठल्याही उमेदवाराला एवढा मोठा विजय मिळाला नाही. राजेश्वर सिंह यांना 49.13 टक्के मतं मिळाली आहेत. तर, समाजवादी पक्षाचे उमेदवार अभिषेक मिश्रा यांना 31.81 टक्के मतं मिळाले आहेत. 

ईडीत 14 वर्षे केली सेवा

ईडीतील माजी सहआयुक्त राजेश्वर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. विशेष नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांच तिकीट जाहीर झालं होतं. लखनौच्या सरोजनी नगर विधानसभा मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्यात आलं. सिंह हे सन 2007 मध्ये ते अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीमध्ये कार्यरत झाले होते. तत्पूर्वी त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनात 10 वर्षे पोलीस खात्यात काम केलं असून 14 वर्षे ते ईडी विभागात कार्यरत होते.  
 

Web Title: UP Assembly Result: Fighting elections with voluntary retirement from ED, Rajeshwar Singh won by record-breaking votes in lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.