नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 01:54 PM2024-08-23T13:54:05+5:302024-08-23T14:13:59+5:30

नेपाळमध्ये ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

UP bus carrying 40 Indian passengers fell into a river in Nepal | नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश

नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश

Nepal Bus Accident : नेपाळमध्ये शुक्रवारी मोठा बस अपघात झाला. नेपाळमध्ये ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. उत्तर प्रदेशातील ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. या भीषण दुर्घटनेत १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथली नोंदणीकृत बस येथून प्रवाशांना घेऊन नेपाळकडे निघाली होती. बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेपाळच्या तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात उत्तर प्रदेशातील बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुचे डीएसपी दीपकुमार राय यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेश एफटी ७६२३ क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये तब्बल ४० प्रवासी होती आणि त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला. 

नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलासह नेपाळ आपत्ती व्यवस्थापनाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखाली ४५ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकासह अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय प्रवासी पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पोखराहून काठमांडूसाठी निघालेल्या बसचा अपघात झाला.

नेपाळच्या सशस्त्र पोलिसांचे सहायक प्रवक्ते शैलेंद्र थापा यांनी सांगितले की, घटनास्थळावरून १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १६ जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे बस ज्या नदीत पडली त्या नदीलाही तडाखा बसला आहे. बसमध्ये ४० जण होते, त्यापैकी काहींना वाचवण्यात यश आले आहे.

Web Title: UP bus carrying 40 Indian passengers fell into a river in Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.