क्रिकेटच्या मैदानावर उतरले CM योगी, केली जबरदस्त बॅटिंग; पाहा - VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 05:45 PM2022-10-31T17:45:17+5:302022-10-31T17:46:24+5:30
सरदार पटेल राष्ट्रीय दिव्यांग चषक T20 च्या दुसऱ्या सत्राचा उद्घाटन समारंभ 31 ऑक्टोबर 2022 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौच्या इकना स्टेडियममध्ये पार पडला. देशातील दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी ही एक सर्वात मोठी स्पर्धा आहे.
आपल्या शिस्तबद्ध कारभारासाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आणखी एक वेगळे रूप सोमवारी बघायला मिळाले. ते चक्क क्रिकेटच्या मैदानात उतरलेले दिसून आले. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी बॅटिंगदेखील केली. ते सरदार पटेल राष्ट्रीय दिव्यांग-T20 कप स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लखनौ येथे आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर त्यांनी बॅटिंग केली.
टी-20 सामन्याची फायनल मॅच 7 नोव्हेंबरला -
सरदार पटेल राष्ट्रीय दिव्यांग चषक T20 च्या दुसऱ्या सत्राचा उद्घाटन समारंभ 31 ऑक्टोबर 2022 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौच्या इकना स्टेडियममध्ये पार पडला. देशातील दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी ही एक सर्वात मोठी स्पर्धा आहे. देशभरातील दिव्यांग क्रिकेटपटूंचे वीस संघ, या आठ दिवस चालणाऱ्या मालिकेत विजयी होण्यासाठी एकमेकांशी लढतील. लखनौच्या केडी बाबू क्रिकेट स्टेडियमवर 7 नोव्हेंबरला या टी-20 चषकाचा अंतिम सामना खेळवला जाईल. दीपा मलिक, (पद्मश्री, खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेते), पॅरालिम्पिक पदक विजेती, सरदार पटेल या राष्ट्रीय अपंग T20 कपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
#WATCH | Uttar Pradesh CM Yogi Adityanath plays cricket after the inaugural program of 'Sardar Patel National Divyang-T20 Cup' tournament, in Lucknow pic.twitter.com/un8e0w1acB
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 31, 2022
टोर्नामेंटमध्ये भाग घेणार 400 हून अधिक दिव्यांग क्रिकेटर -
नुकतेच, दिव्यांग क्रिकेटर्सच्या जीवनात, राष्ट्रीय दिव्यांग कप टी-20 च्या पहिल्या सीझनचे यश आणि प्रभाव पाहिल्यानंतर, इंडियन बँक याकडे चांगल्या कारणासाठी योगदान देण्याची संधी म्हणून पाहत आहे. या टोर्नामेंटमध्ये 400 हून अधिक दिव्यांग क्रिकेटर आपले कौशल दाखवतील.