अर्ध्या रात्री प्रेयसीच्या घरात शिरणं पोलीस शिपायाला महागात पडलं, शेजाऱ्यांना पाहताच कपडे सोडून पळावं लागलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:29 PM2022-04-19T15:29:59+5:302022-04-19T15:37:15+5:30
संबंधित हवालदाराला पूरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंघचाई चौकीवर एक वर्ष झाले आहे. या दरम्यान चौकी शेजारीच असलेल्या महिलेसोबत त्याची जवळीक वाढली.
एका पोलीस कर्मचाऱ्याला अर्ध्या रात्री प्रेयसीला भेटायला जाणे चांगलेच महागात पडले. हा पोलीस कर्मचारी चक्क अर्ध्या रात्री पोलीस चौकीजवळ राहणाऱ्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. हे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला घेरले. यानंतर गडबडलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याने कपडे न घालता, हातात चप्पल घेऊन तेथून पळ काढला. ग्रामस्थांच्या नाराजीनंतर संबंधित हवालदाराला त्या चौकीवरून दुसरीकडे हलविण्यात आले. यानंतर, एसपींनी त्यांना निलंबित केले आहे.
संबंधित हवालदाराला पूरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंघचाई चौकीवर एक वर्ष झाले आहे. या दरम्यान चौकी शेजारीच असलेल्या महिलेसोबत त्याची जवळीक वाढली. गेल्या काही दिवसांत नाईट डिवटीवर असलेला हा कर्मचारी महिलेच्या घराजवळच फिरत आपली ड्यूटी करत होता. विवाहित महिलेच्या पतीला यासंदर्भात माहिती नव्हती. रविवारी रात्री उशिरा हा कर्मचारी या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला.
आधीपासूनच आरोपीवर लक्ष ठेवून होते शेजारचे लोक -
आधीपासूनच आरोपीवर लक्ष ठेवून असलेल्या लोकांनी तो तिला भेटण्यासाठी जाताच त्याला घेरले. या नंतर हा आरोपी पोलीस कर्मचारी केवळ बनियन-अंडरविअर आणि हातात चप्पल घेऊन भिंतीवरून उडीमारून पोलीस चौकीवर पळून गेला. गावकऱ्यांनी त्याचा पाठलागही केला होता. यानंतर, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला चौकीवरून हटविण्यात आले.
यासंदर्भात बोलताना एसपी दिनेश कुमार पी म्हणाले, चौकी इंचार्जच्या रिपोर्टवरून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. यांदर्भात सीओ पूरनपूर तपास करतील.