मां तुझे सलाम! दीड वर्षांच्या लेकाला कुशीत घेऊन 'तिने' बजावलं कर्तव्य; अधिकाऱ्यांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 10:42 AM2024-02-18T10:42:03+5:302024-02-18T10:42:56+5:30
एसएस इंटर कॉलेजसमोर एक महिला पोलीस आपल्या मुलासह दिसली. कामासोबतच आई म्हणून कर्तव्य बजावताना दिसली.
उत्तर प्रदेशमध्ये 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी कॉन्स्टेबल भरती परीक्षा होत आहे. त्यामुळे मुरादाबादमध्ये 1 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले असून, त्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. मुरादाबादच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसएस इंटर कॉलेजसमोर एक महिला पोलीस आपल्या मुलासह दिसली. कामासोबतच आई म्हणून कर्तव्य बजावताना दिसली.
लेडी कॉन्स्टेबल गीता आपल्या मुलाला आपल्या कुशीत घेऊन ड्युटी करत होती. ती मुरादाबादच्या कोतवाली सदरमध्ये तैनात आहेत. तिची ड्युटी एसएस इंटर कॉलेज, मुरादाबाद येथे दोन दिवस आहे. लेडी कॉन्स्टेबल गीता हिने दिलेल्या माहितीनुसार, पती आणि बहीण घरी आहेत. पती देखील उत्तर प्रदेशपोलिसात आहे आणि आज परीक्षा ड्युटीवर आहेत.
सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ड्युटी असल्याचं तिने सांगितलं. लहान बहिणीचाही आज पोलीस भरतीचा पेपर आहे. त्यामुळे मुलाला सोबत घेऊन मी कर्तव्य बजावत आहे. माझा मुलगा 5 महिन्यांचा होता तेव्हापासून मी दररोज त्याला माझ्यासोबत घेऊन ड्युटीवर येते. आता मुलगा दीड वर्षाचा असल्याने त्रास कमी झाला आहे.
एसपी सिटी अखिलेश भदौरिया यांनी जेव्हा लेडी कॉन्स्टेबलच्या ड्युटीवर तिच्या मुलासह पाहिलं. तेव्हा त्यांनी तिचं कौतुक केलं. आमचे पोलीस त्यांच्या कर्तव्यासाठी सदैव तत्पर असतात. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पतीही पोलिसात आहे, त्यामुळे ती परीक्षेच्या वेळी मुलासोबत ड्युटीसाठी आली होती. प्रत्येकजण आपापल्या कर्तव्यासोबत कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. हे कौतुकास्पद आहे असं म्हटलं.