"फोनवर बोलायची म्हणून..."; पतीने केली पत्नी आणि सासूची निर्घृण हत्या, मृतदेहाला पाहत राहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:10 PM2024-12-02T17:10:35+5:302024-12-02T17:18:42+5:30

उत्तर प्रदेशात एका पतीने पत्नी आणि सासूची निर्घृणपणे हत्या केली आहे.

UP Crime Husband killed wife and mother in law in Kanpur | "फोनवर बोलायची म्हणून..."; पतीने केली पत्नी आणि सासूची निर्घृण हत्या, मृतदेहाला पाहत राहिला

"फोनवर बोलायची म्हणून..."; पतीने केली पत्नी आणि सासूची निर्घृण हत्या, मृतदेहाला पाहत राहिला

UP Crime : उत्तर प्रदेशात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाने पत्नी आणि सासूची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. दोघांच्याही किंचाळण्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकून पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली आहे. गेटचे कुलूप तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला असता दोघांचेही पडलेले दिसले. आरोपीने पत्नीचे अन्य कोणाशी तरी अवैध संबंध असल्यामुळे हत्या केल्याची कबुली दिली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील चकेरी पोलीस स्टेशन परिसरात दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तरुणाने हा दोघांचा खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटर जोसेफ नावाच्या व्यक्तीने आधी आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्यानंतर मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या सासूलाही पीटरने संपवलं. शेजाऱ्यांच्या माहितीवरून पोलिस तेथे पोहोचले आणि आरोपीला अटक केली.

रविवारी रात्री फ्रेंड्स कॉलनीतील शेजाऱ्यांना महिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गेटचे कुलूप तोडले असता त्यांनाही धक्का बसला. आतमध्ये दोन महिलांचे रक्ताने माखलेले मृतदेह पडले होते. आरोपी तिथेच बेडवर बसला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

आरोपी पीटर जोसेफने २०१७ मध्ये मृत कामिनीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर तो फ्रेंड्स कॉलनीतील घरात सासू पुष्पा आणि पत्नी कामिनीसोबत राहू लागला. पीटरने सांगितले की, त्याच्या पत्नीचे दिल्लीतील एका तरुणाशी अवैध संबंध होते. रविवारीही ती तिच्या प्रियकराशी बोलत होती. आपण बोलण्यास नकार दिल्याने तिने भांडण सुरू केले. यानंतर त्याने पत्नीची हत्या केली. मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या सासूलाही मारण्यात आले. 

रात्री जोसेफने ई-रिक्षा बोलावून पत्नीला कुठेतरी जाण्यास सांगितले, मात्र पत्नीने नकार दिल्याने वाद वाढला. रागाच्या भरात जोसेफने घराचे गेट आतून बंद केले आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की त्याने मोठ्या चाकूने पत्नी कामिनी हिच्यावर हल्ला केला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. सासू पुष्पा वाचण्यासाठी आल्यावर जोसेफने तिचीही निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपी पीटर घटनास्थळावरून पळून गेला नाही. उलट घराचा दरवाजा आतून बंद करून मृतदेहाजवळ बसून सुमारे अर्धा तास मृतदेहांना पाहत राहिला.

Web Title: UP Crime Husband killed wife and mother in law in Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.