"मारू नकोस, मी घटस्फोट देतो"; बॉयफ्रेंन्डसोबत मिळून केली हत्या, पतीचा मृतदेह ड्रममध्ये टाकून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:53 IST2025-03-19T09:40:40+5:302025-03-19T09:53:48+5:30
उत्तर प्रदेशात एका घरात ड्रममध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

"मारू नकोस, मी घटस्फोट देतो"; बॉयफ्रेंन्डसोबत मिळून केली हत्या, पतीचा मृतदेह ड्रममध्ये टाकून...
Meerut Crime :उत्तर प्रदेशच्या मेरठमधून हादरवून टाकणारं टाकणारं हत्याकांड समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका महिलेने प्रियकरासह पतीची हत्या केली. दोघांनी मृतदेहाचे १५ तुकडे करून ते एका ड्रममध्ये भरुन त्यात सिमेंट भरलं होतं. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिलेनेच तिच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. सौरभची पत्नी मुस्कानने प्रियकरासह मिळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून ठेवले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आलं. पोलिसांना दोन तासांच्या प्रयत्नानंतरही ड्रम उघडता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ड्रम ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. त्यानंतर ड्रम कापून त्यातून मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यात आले. सिमेंटमुळे मृतदेह कडक झाला होता.
मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा सौरभ राजपूत हा पत्नी मुस्कान रस्तोगी आणि पाच वर्षांच्या मुलीसह इंदिरानगरमध्ये राहत होता. नोकरीच्या निमित्ताने तो लंडनला होता आणि काही दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. सौरभ आणि मुस्कानचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये वाद होऊ लागला ज्यामुळे तीन वर्षांपासून ते इंदिरानगरमध्ये भाड्याच्या घरात राहू राहू लागले. ४ मार्चला सौरभ मेरठमध्ये आला होता. त्यानंतर मुस्कानने आजूबाजूच्या लोकांना आम्ही हिमाचल प्रदेशला फिरायला जातोय असं सांगितले. तेव्हापासून मुस्कान आणि सौरभ कोणीही दिसलं नाही. त्यानंतर अचानक मुस्कानने प्रियकरासह सौरभची हत्या केल्याचे तिच्या आईला सांगितले. मुस्कानच्या आईने पोलीस ठाणे गाठलं आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.
त्यानंतर पोलिसांनी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आलं. मुस्कानने प्रियकर साहिलसोबत मिळून सौरभची हत्या केली होती. लोकांना कळू नये म्हणून सौरभच्या मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये टाकून घरात लपवून ठेवले होते. डॉक्टरांनी ड्रम कापून त्यातून सौरभचा मृतदेह बाहेर काढला.
कशी केली हत्या?
पाच वर्षांच्या मुलीमुळे सौरभने मुस्कानला घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुस्कानने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने झोपलेल्या सौरभचा हात धरुन ठेवला. त्यानंतर साहिलने त्याच्या छातीवर चाकूने वार केले. पहिल्या हल्ल्यात सौरभ ओरडला. मला मारू नकोस, मी तुला घटस्फोट देईन, असं सौरभ म्हणाला. पण साहिल आणि मुस्कान थांबले नाहीत. त्यांनी सौरभची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले.
मुस्कान आणि साहिल ड्रग्जही घेत होते. खुनाच्या दिवशीही दोघांनी सिगारेटमध्ये ड्रग्ज घेतले होते. त्याच नशेत सौरभची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये भरले. त्यानंतर त्यावर सिमेंट टाकलं आणि पाणी ओतलं. ते सिमेंट एका रात्रीच दगडासारखे झाले. हत्येनंतर दोघेही तिथेच होते. बाजारातून त्यांनी ड्रम आणि सिमेंटची गोणी खरेदी केली होती. सौरभने त्याबाबत विचारले असता तिने पीठ भरण्यासाठी ड्रम ठेवल्याचे सांगितले. तर साहिलने सिमेंटची गोणी मित्राच्या घरी ठेवली होती. हत्येनंतर तो सिमेंट बाईकवर घेऊन आला होता.