होणाऱ्या पतीसमोरच मुलीवर अत्याचार; आठपैकी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन दिवसांनी समोर आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 19:46 IST2025-04-14T19:41:58+5:302025-04-14T19:46:04+5:30

उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

UP Crime Kasganj 8 people gang-raped a girl in front of her fiance | होणाऱ्या पतीसमोरच मुलीवर अत्याचार; आठपैकी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन दिवसांनी समोर आला प्रकार

होणाऱ्या पतीसमोरच मुलीवर अत्याचार; आठपैकी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोन दिवसांनी समोर आला प्रकार

UP Crime: वाराणसी अत्याचार प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असताना उत्तर प्रदेशातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कासगंज ये जिल्ह्यात एका मुलीवर तिच्या होणाऱ्या पतीसमोर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. पीडित महिला तिच्या होणाऱ्या पतीसोबत पिकनिक पॉईंटला गेली होती. यादरम्यान ८ तरुणांनी मुलीला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीच्या होणाऱ्या पतीने याला विरोध केला असता त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून तिघांचा शोध सुरु केला आहे.

उत्तर प्रदेशातील कासगंज येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाने खळबळ उडाली आहे. ८ तरुणांनी अल्पवयीन मुलीसोबत तिच्या होणाऱ्या पतीसमोरच अत्याचार केले. आरोपीने मुलीचे कपडेही तिच्या होणाऱ्या पतीसमोर काढले. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनमधून हा व्हिडिओ जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून त्यातील एक भाजप नेता असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

१० एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. कासगंजमधील झाल पुलाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या कालव्याजवळ ही मुलगी तिच्या होणाऱ्या पतीसोबत बसली होती. यादरम्यान काही तरुण तिथे पोहोचले आणि त्यांनी अश्लील विधाने करायला सुरुवात केली. होणाऱ्या पतीने विरोध केल्यानंतर आरोपींनी त्याला पकडून जबर मारहाण केली आणि डांबून ठेवले. यानंतर, सर्व आरोपींनी मुलीला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित मुलगी भीतीमुळे दोन दिवस गप्प होती. मात्र तब्येत बिघडल्यानंतर तिने कुटुंबाला संपूर्ण प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी मुलीला घटनास्थळी नेले आणि ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींच्या फोनमधून मुलीचे कपडे काढून टाकल्याचे व्हिडिओही सापडले आहेत.

कासगंज जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक अंकिता शर्मा यांनी या घटनेबाबत माहिती दिली. "मुलीवर तिच्या होणाऱ्या पतीसमोर बलात्कार करण्यात आला. यादरम्यान त्यांचे पैसेही हिसकावून घेण्यात आले. या संदर्भात माहिती मिळताच विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला. यापैकी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरितांचा शोध सुरू आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते जलदगती न्यायालयात चालवण्याचा प्रयत्न केला जाईल," असे पोलीस अधिक्षक अंकिता शर्मा म्हणाल्या.

Web Title: UP Crime Kasganj 8 people gang-raped a girl in front of her fiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.