फेसबुकने बनवली जोडी! भारतीय तरुणाच्या प्रेमात वेडी झाली इंडोनेशियाची तरुणी अन् मग... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 05:27 PM2022-12-12T17:27:28+5:302022-12-12T18:10:38+5:30

इंडोनेशियातील एक तरुणी उत्तर प्रदेशच्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे.

up deoria love happened on facebook sanwar returned with foreign bride after marrying | फेसबुकने बनवली जोडी! भारतीय तरुणाच्या प्रेमात वेडी झाली इंडोनेशियाची तरुणी अन् मग... 

फोटो - आजतक

Next

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे इंडोनेशियातील एक तरुणी उत्तर प्रदेशच्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे. इंग्लिश स्पोकन कोर्सदरम्यान त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये राहणारा सनवर अली हा 2015 मध्ये फेसबुकशी जोडला गेला. त्याचवेळी त्याला इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. 

इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या मिफ्ताहुल जन्नाह नावाच्या तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2017 मध्ये भारतात एक चक्रिवादळ आलं होतं. त्यामुळे मोठं नुकसान झालं. तेव्हा जन्नाहने तुम्ही ठीक आहात ना असा प्रश्न विचारत विचारपूस केली होती. तेव्हा त्याला प्रेमाची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. सनवर तरुणीच्या प्रेमात पडला. तिने ही सहा महिन्यांनी त्याला होकार दिला. 

28 ऑगस्ट 2018 मध्ये सनवर मुलीला भेटण्यासाठी थेट इंडोनेशियामध्ये पोहोचला. त्यानंतर सनवरने मुलीच्या कुटुंबीयांना या नात्यासाठी तयार केलं आणि दोघांनी निकाह करण्याचा निर्णय घेतला. जन्नाह इंडोनेशियाच्या मेंदान शहरात आपली आई आणि दोन बहिणींसह राहते. कुटुंबीयांच्या सहमतीने त्यांनी रिंग सेरेमनी केली. त्यानंतर कोरोनामुळे त्यांचा निकाह पुढे ढकलला गेला. 28 ऑक्टोबर 2022 मध्ये निकाह केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: up deoria love happened on facebook sanwar returned with foreign bride after marrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.