UP Election 2022: “लखनऊमध्ये कन्हैय्या कुमार यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला?”; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 10:48 PM2022-02-01T22:48:39+5:302022-02-01T22:50:09+5:30

UP Election 2022: लखनऊमध्ये एका कार्यक्रमात अज्ञात तरुणाने कन्हैय्या कुमार यांच्यावर शाई फेकल्याने एकच खळबळ उडाली.

up election 2022 congress leaders said it was acid attack ink thrown at kanhaiya kumar at party office in lucknow | UP Election 2022: “लखनऊमध्ये कन्हैय्या कुमार यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला?”; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

UP Election 2022: “लखनऊमध्ये कन्हैय्या कुमार यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला?”; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

Next

लखनऊ: विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे उत्तर प्रदेशमधील (UP Election 2022) राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांच्यावर लखनऊमध्ये शाईफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी शाईफेकणाऱ्यांना बेदम चोप दिला. मात्र, कन्हैय्या कुमार यांच्यावर शाई नाही तर, अ‍ॅसिड सदृष्य केमिकल फेकण्यात आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

लखनऊमध्ये विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवार सदफ जाफरने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी कन्हैया कुमार हे लखनऊमध्ये आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना जमलेल्या कार्यकर्त्यांना कन्हैया यांनी मार्गदर्शन केले व मतदारांना आवाहन केले. हा कार्यक्रम सुरू असतानाच अज्ञात तरुणाने त्यांच्यावर शाई फेकल्याने एकच खळबळ उडाली. या तरुणाला उपस्थित कार्यकर्त्यांनी पकडले व बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलीस अधिक चौकशी करत आहे. 

अ‍ॅसिड सदृष्य केमिकल फेकण्याचा प्रयत्न

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या घटनेची माहिती देताना गंभीर आरोप केले आहेत. कन्हैया कुमार यांच्यावर शाई नाही तर अ‍ॅसिड सदृष्य केमिकल फेकण्याचा प्रयत्न झाला, असा मोठा दावा करण्यात आला आहे. कन्हैया यांच्या दिशेने हे केमिकल फेकले असता बाजूला असलेल्या आणखी तीन ते चार जणांवरही त्याचे थेंब उडाल्याचे सांगण्यात आले असून घटनास्थळावरचे पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत.

दरम्यान, लखनऊमध्ये येथून काँग्रेसने सदफ जाफर हिला तिकीट दिले आहे. सदफ ही अभिनेत्री असून, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही तिचे नाव आहे. लखनऊमध्येच तिचे घर असून, मीरा नायर यांच्या ए सुटेबल बॉय या चित्रपटात तिने भूमिका केली आहे. २०१९ मध्ये सीएए विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले होते. त्या आंदोलनात सदफ जाफर सहभागी झाली होती. लखनऊ पोलिसांनी तिला अटकही केली होती. नंतर तिची जामिनावर मुक्तता झाली होती.
 

Web Title: up election 2022 congress leaders said it was acid attack ink thrown at kanhaiya kumar at party office in lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.