UP Election 2022: गोरखपूरमधून योगींचा मार्ग सुकर; निकटवर्तीय राहिलेले शुक्ला यांच्या पत्नी सपाकडून रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 06:15 AM2022-03-02T06:15:21+5:302022-03-02T06:16:10+5:30

UP Election 2022: पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विजय निश्चित आहे.

up election 2022 easy way for cm yogi adityanath from gorakhpur | UP Election 2022: गोरखपूरमधून योगींचा मार्ग सुकर; निकटवर्तीय राहिलेले शुक्ला यांच्या पत्नी सपाकडून रिंगणात

UP Election 2022: गोरखपूरमधून योगींचा मार्ग सुकर; निकटवर्तीय राहिलेले शुक्ला यांच्या पत्नी सपाकडून रिंगणात

Next

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

गोरखपूर : पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वाट जास्तीत जास्त खडतर करण्यासाठी विरोधी पक्षांनी कोणतीही कसर सोडलेली नसली, तरी  योगी यांचा विजय निश्चित आहे. कधी काळी त्यांचा उजवा हात मानले जाणारे उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी सुभावती समाजवादी पार्टीकडून आणि आझाद समाज पार्टीचे चंद्रशेखर रावण हे योगींविरुद्ध मैदानात आहेत.
 बसपाने ख्वाजा मोईनुद्दीन यांना, तर काँग्रेसने चेतना पांडे यांना मैदानात उतरविले आहे. उपेंद्र शुक्ला हे योगी यांचे हनुमान मानले जायचे. निवडणुकीच्या प्रचाराची धुरा शुक्ला यांच्याकडेच होती.

 या जवळिकीमुळेच मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी यांनी  २०१८ च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शुक्ला यांना उमेदवारी दिली होती; परंतु, समाजवादी पार्टीचे  प्रवीण निषाद यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.  त्यानंतर निषाद हे भाजपमध्ये सामील झाल्यानंतर २०१९ मध्ये ते संत कबीर नगर  लोकसभा मतदार संघातून निवडून आले. 

त्यावेळी भाजपने उपेंद्र शुक्ला यांच्याऐवजी रविकिशन यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिली होती. तथापि, शुक्ला यांनी  रविकिशन यांच्या प्रचारात पुढाकार घेतला होता. २०२० मध्ये शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सर्वाधिक विकास....

गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशात सर्वाधिक विकास गोरखपूरमध्ये झाला. नवीन चकचकीत रुंद रस्ते, २४ तास वीज, प्रत्येक घरात स्वच्छ पेयजल, रामगढ सरोवराचे सौंदर्यीकरण, खताचा कारखाना, एम्स आणि  विमानतळ  हे सर्व गोरखपूरच्या विकासाचे प्रतीक आहे.

योगींना पाठिंबा का?

गोरखनाथ मठाचे महंत म्हणून योगी आदित्यनाथ यांना पूर्व उत्तर प्रदेश व्यतिरिक्त नेपाळमध्येही खूप आदर आहे. तथापि, गोरखपूरध्ये  ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील ५० वर्षांपासूनच्या संघर्षात ते राजपुतांची बाजू घेताना दिसले; परंतु, यावेळी  हिंदुत्ववादी म्हणून लोक जातीचा विचार न करता त्यांना पाठिंबा देत असल्याचे दिसते.

Web Title: up election 2022 easy way for cm yogi adityanath from gorakhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.