UP Election 2022: कैरानात पलायन मुद्दा प्रचारात पुन्हा सगळ्यात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:42 AM2022-01-31T06:42:37+5:302022-01-31T06:43:15+5:30

UP Election 2022:पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत सगळ्यात महत्त्वाचा आहे कैराना. कैरानात २०१६ मध्ये झालेल्या पलायनाचा मुद्दा आता परत तापत चालला आहे.

UP Election 2022: Exodus issue in Kairana again at the forefront of the campaign | UP Election 2022: कैरानात पलायन मुद्दा प्रचारात पुन्हा सगळ्यात पुढे

UP Election 2022: कैरानात पलायन मुद्दा प्रचारात पुन्हा सगळ्यात पुढे

Next

- राजेंद्र कुमार 
 लखनौ : पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत सगळ्यात महत्त्वाचा आहे कैराना.कैरानात २०१६ मध्ये झालेल्या पलायनाचा मुद्दा आता परत तापत चालला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घरोघर जाऊन केलेल्या प्रचारात पलायनाचा मुद्दा वारंवार सांगितला आहे.
प्रचारात अमित शहा यांनी योगी सरकारच्या कामकाजाची प्रशंसा करताना म्हटले की, ‘आता येथे पलायन करण्यास भाग पाडणाऱ्यांनाच किंमत मोजावी लागत आहे असा विश्वास आम्ही राज्यातील जनतेत बघत आहोत.”   
कैरानात २०१७ मध्ये भाजपने पलायनाच्या मुद्द्याला हवा दिली व कायदा व सुव्यवस्थेशी जोडून समाजवादी पार्टी सरकारची कोंडी केली होती. 

Web Title: UP Election 2022: Exodus issue in Kairana again at the forefront of the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.