UP Election 2022: भाजपा-सपामध्ये थेट लढत, उत्तर प्रदेशात सत्तांतर होणार की, योगी सत्ता राखणार? महापोलमधून समोर आला असा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 07:28 PM2022-01-22T19:28:21+5:302022-01-22T19:29:02+5:30

UP Election 2022 Update: समोर येत असलेल्या माहितीमधून उत्तर प्रदेशात BJP आणि Samajwadi Partyमध्ये थेट लढत होत असल्याचे दिसत आहे. तर विविध ओपिनियन पोल्समधून भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

UP Election 2022: Fighting directly between BJP and SP, will there be independence in Uttar Pradesh or will Yogi retain power? The trend that came to the fore from Mahapoll | UP Election 2022: भाजपा-सपामध्ये थेट लढत, उत्तर प्रदेशात सत्तांतर होणार की, योगी सत्ता राखणार? महापोलमधून समोर आला असा कल

UP Election 2022: भाजपा-सपामध्ये थेट लढत, उत्तर प्रदेशात सत्तांतर होणार की, योगी सत्ता राखणार? महापोलमधून समोर आला असा कल

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची लढाई ही रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. दरम्यान, समोर येत असलेल्या माहितीमधून उत्तर प्रदेशात भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये थेट लढत होत असल्याचे दिसत आहे. तर विविध ओपिनियन पोल्समधून भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यंत ७ प्रमुख वृत्तवाहिन्यांचे ओपिनयन पोल्स समोर आले असून, आता हे ओपिनियन पोल्स एकत्रित करत न्यूज १८ इंडियाने महापोल समोर आणला असून, त्यामधून उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या लढाईचं चित्र अधिक स्पष्ट झालं आहे. या महापोलमधून नेमका काय कल समोर आला आहे, तो पुढीलप्रमाणे आहे.

एबीपी-सी वोटर 
एबीपी-सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला २२३ ते २३५ जागा मिळतील. तर सपा आघाडीला १४५ ते १५७ जागा मिळतील. बसपाला ८ ते १६ आणि काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळतील.  
इंडिया टीव्ही
इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला २३० ते २३५ जागा मिळतील. सपा आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील. बसपाला २ ते ५ जागा मिळतील. तर काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळतील. 
रिपब्लिक टीव्ही-पी मार्क 
रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला २५२ ते २७२ जागा मिळतील. तर सपाला १११ ते १३१ जागांवर विजय मिळू शकतो. बसपाला ८ ते १६ जागा आणि काँग्रेसला ३ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. 
न्यूज एक्स-पोल स्टार्ट 
न्यूज एक्स पोल स्टार्टने केलेल्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला २३५ ते २४५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा आघाडीला १२० ते १३० जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाच्या खात्यामध्ये १३ ते १६ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ४ ते ५ जागा मिळू शकतात. 
टाइम्स नाऊ-वीटो 
टाइम्स नाऊ-वीटोच्या ओपिनियन पोलनुसारा भाजपाला २२७ ते २५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपाला १३६ ते १५१ जागा मिळू शकतात. बसपाचा विचार केला तर बसपाला ८ ते १४ आणि काँग्रेसला ६ ते ११ जागा मिळू शकतात. 
झी-डिझाइन बॉक्स 
झी डिझाइन बॉक्सच्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला यूपीमध्ये २४५ ते २६७ जागा मिळू शकतात. तर सपाला १२५ ते १४८ जागा मिळू शकतात. तर बसपाच्या खात्यामध्ये ५ ते ९ जागा जाऊ शकतात. काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळू शकतात.  
इंडिया न्यूज-जन की बात 
इंडिया न्यूज जन की बात ने केलेल्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला २२६ ते २४६ जागा मिळू शकतात. तर सपाला १४४ ते १६० जागा मिळू शकतात. तर मायावतींच्या बसपाला ८ चे १२ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला शून्य ते १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज १८ चा महापोल काय सांगतो
या सर्व ओपिनियन पोलचा आधार घेत तयार करण्यात आलेल्या महापोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला सरासरी २३५ ते २४९ जागा मिळण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टीच्या आघाडीला १३७ ते १४७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बसपाला ७ ते १३ जागांवरच समाधान मानावे लागू शकते. तर काँग्रेसच्या खात्यामध्ये ३ ते ७ जागा जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमताचा आकडा २०२ आहे. त्यामुळे या महापोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा केवळ अंदाजच आहे. आता नेमका विजेता कोण ठरेल हे १० मार्च रोजी निकालांमधूनच समोर येणार आहे.  

Web Title: UP Election 2022: Fighting directly between BJP and SP, will there be independence in Uttar Pradesh or will Yogi retain power? The trend that came to the fore from Mahapoll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.