UP Election 2022 : उत्तर प्रदेशात सपा, बसपाचं राज्य आलं तर पुन्हा माफीया राज येईल - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 04:04 PM2022-01-29T16:04:11+5:302022-01-29T16:04:32+5:30
UP Election 2022 : अखिलेश यादव आणि जयंत चौधरी केवळ मतमोजणीपर्यंतच सोबत, अमित शाह यांची टीका
UP Election 2022 : सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह (Amit Shah) यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. उत्तर प्रदेशात जर सपा आणि बसपाचं सरकार आलं तर पुन्हा एकदा माफिया राज येईल. जर तुम्ही भाजपला मत दिलं तर आम्ही उत्तर प्रदेशला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवू असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं. मुझफ्फरनगरच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी विरोधकांवर निशाणा शाधला.
यावेळी बोलताना त्यांनी मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीची आठवण काढली. "या दंगलीत जे आरोपी होते, त्यांना पीडित दाखवण्यात आलं. पोलिसांनी व्होट बँक ध्यानात ठेवून कारवाई केली. हजारो खोट्या केसेस टाकल्या. या प्रकरणी भाजप दंगलीतील पीडितांसोबत खंबीरपणे उभी राहिली," असं अमित शाह म्हणाले. मुझफ्फरनगर आणि पश्चिम उत्तर प्रदेशची जनता दंगलींना विसरली आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री @AmitShah मुजफ्फरनगर में घर-घर संपर्क करते हुए...#यूपी_मांगे_भाजपाhttps://t.co/w0Nz2E66bc
— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) January 29, 2022
"जर तुम्ही त्या दंगली विसरला नसाल तर त्यांना मत देण्याची चूक करू नका. अन्यथा पुन्हा एकदा दंगल घडवणारे लोक सत्तेवर येतील. भाजपच्या कार्यकाळात एकगी दंगल झाली नाही. दंगल घडवणारे तुरुंगात आहेत. भाजपनं कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं आहे. अखिलेश यादव यांना काहीही वाटत नाही. त्यांनी काल या ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली नसल्याचं म्हटलं. आज मी सार्वजनिकरित्या या ठिकाणी आकडेवारी देण्यास आलोय. हिम्मत असेल तर आकडेवारी घेऊन पत्रकार परिषदेत मांडा," असंही ते म्हणाले.
अखिलेश यादवांवर निशाणा
"उत्तर प्रदेशात अखिलेश यादवस जयंत यादव मतमोजणीपर्यंतच सोबत आहे. जर सपाचं सरकार स्थापन झालं, तर आझम खान सरकारमध्ये येतील आणि जयंत चौधरी बाहेर होतील," असंही शाह म्हणाले. यावेळी त्यांनी सपा आरएलडीवर निशाणा साधला. त्यांची उमेदवारांची यादीच निवडणुकीनंतर काय होईल हे सांगत असल्याचं त्यांनी नमूद केलं.