UP Election 2022: चल चल मेरे साथी... ओ मेरे हाथी; कमळ खुलले, सायकल धावली, तिसरी ताकद कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:06 AM2022-02-28T10:06:36+5:302022-02-28T10:07:22+5:30

UP Election 2022: थेट लढाईची भाषा बदलत असून भाजप स्वतः बसपला तिसरी ताकद म्हणत राजकीय डाव टाकत आहे.

up election 2022 sixth phase election and political situation | UP Election 2022: चल चल मेरे साथी... ओ मेरे हाथी; कमळ खुलले, सायकल धावली, तिसरी ताकद कोण?

UP Election 2022: चल चल मेरे साथी... ओ मेरे हाथी; कमळ खुलले, सायकल धावली, तिसरी ताकद कोण?

googlenewsNext

धर्मराज हल्लाळे, लोकमत न्यूज नेटवर्क 

पिपराईच : पूर्वांचलमधील सहाव्या टप्प्यातील दहा जिल्ह्यांत मुख्यमंत्री योगींच्या प्रभावाने कमळ खुलले आहे. त्याचवेळी योगींच्या बालेकिल्ल्यात पिपराईचमध्ये दाखल होऊन अखिलेश यांनी सायकल धावणार याचे संकेत दिले, तर आजवरची थेट लढाईची भाषा बदलत असून भाजप स्वतः बसपला तिसरी ताकद म्हणत राजकीय डाव टाकत आहे.

शनिवारी सप नेते अखिलेश यादव यांची पिपराईच येथे, तर बसप प्रमुख मायावती यांची गोरखपूरमध्ये सभा झाली. योगींनी अखिलेश यादव यांना दंगेश म्हटले, याचा संदर्भ देत अखिलेश म्हणाले, योगी आहात, खोटे बोलू नका. तुम्ही आरसा बघा, दंगेश तुम्हाला दिसतील. आमचे सरकार आले की भरती सुरू करू. गरिबांना पाच वर्षे मोफत धान्य, तेल देऊ.

गोरखपूर जिल्ह्यात शहर मतदारसंघात योगींची बाजू भक्कम आहे. मात्र, एकूण नऊ पैकी गोरखपूर ग्रामीणसह तीन जागांवर समाजवादी पक्षाने कडवे आव्हान उभे केले आहे. जिल्ह्यात २०१७ च्या तुलनेत यावेळी जागा कमी होतील असे चित्र आहे. मुख्यमंत्री योगी जवळपास २० सभा, रॅली याच भागात करणार आहेत. दरम्यान, प्रारंभी सपशी लढाई म्हणणारे भाजप नेते बसप मोठी ताकद आहे सांगून 'हाथी को साथी' करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. अर्थात निवडणूक दुरंगी नव्हे, तिरंगी असल्याचे चित्र भाजप जाणीवपूर्वक समोर आणत आहे. जातीय समीकरणे आणि मतांचे विभाजन लक्षात घेऊन डावपेच आखले जात आहेत.

शिवसेनेचे उत्तर प्रदेशात मुख्य लक्ष २०२७ ची निवडणूक

सिद्धार्थनगर : उत्तर प्रदेशात यावेळी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यास उशीर झाल्याने पक्षाला फारशी तयारी करता आली नाही. मात्र, आमचे खरे लक्ष २०२७ च्या विधानसभा निवडणुका असून, त्यावेळी आम्ही सर्व जागांवर उमेदवार देऊन प्रमुख स्पर्धेत राहू, असा विश्वास शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमधील सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक कुटुंबे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या भागाचा राजकारणावर कमी-अधिक प्रमाणात महाराष्ट्राचाही प्रभाव आहे. त्यामुळे या भागात निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील विविध पक्षातील नेते, मंत्री येत असतात.
 

Web Title: up election 2022 sixth phase election and political situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.