मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:58 PM2024-11-23T21:58:18+5:302024-11-23T22:00:31+5:30

60% मुस्लिम मतदार असलेल्या जागेवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे.

UP election 2024 BJP's Hindu candidate wins in Muslim-majority constituency; 11 Muslim candidates against | मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...

मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...

UP Election 2024 : आज महाराष्ट्र आणि झारखंडसह उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीचेही निकाल लागले. या पोटनिवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. 9 पैकी 6 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. मात्र, यामध्ये कुंडरकी मतदारसंघाचे सर्वाधिक चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे, 60 टक्के मुस्लिम मतदार असलेल्या या जागेवर भाजपचा हिंदू उमेदवार विजयी झाला आहे. 

कुंडरकी जागेवर भाजपने आपला 31 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. भाजपने शेवटची ही जागा 1993 मध्ये जिंकली होती. यावेळी भाजपचे रामवीर सिंह 1 लाख 31 हजार मतांनी विजयी झाले. तर सपाचे हाजी रिजवान यांना फक्त 20 हजार मते मिळाली. विशेष म्हणझे, मुरादाबाद जिल्ह्यात 60 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत आणि विधानसभा जागा जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावता.

मुरादाबादच्या कुंडरकी जागेवर भाजपचे उमेदवार रामवीर सिंह ठाकूर आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार हाजी रिझवान यांच्यात चुरशीची लढत पाहायला हवी होती. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या जागेवर समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला फक्त 20 हजार मते मिळाली. विशेष म्हणजे, ही जागा सपाचा बालेकिल्ला मानली जाते. सपा उमेदवारावर असलेला जनतेचा राग आणि गेल्या 8 वर्षांपासून सक्रीयतेने लोकांचे काम केल्यामुळे भाजप उमेदवार रामवीर सिंह ठाकूर यांना मुस्लिम समाजातील लोकांनी पाठिंबा दिला. 

कुंडरकी विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार रामवीर सिंह यांना 1 लाख 70 हजार 371 मते मिळाली आहेत, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे मोहम्मद रिझवान यांना फक्त 25 हजार 580 मते मिळाली. अशाप्रकारे रामवीर सिंह यांनी 1 लाख 44 हजार 791 मतांनी विजय मिळवला. या जागेवर रामवीर व्यतिरिक्त अन्य 11 उमेदवार होते. हे सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे होते.

मुस्लिमबहुल जागेवर रामवीर सिंगची जादू अशी चालली की, सर्व उमेदवारांचा सुपडा साफ झाला. या जागेवरील 5 पेक्षा जास्त उमेदवारांना NOTA पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.  तर, बहुजन समाज पक्ष कसातरी एक हजाराचा टप्पा गाठू शकला. रामवीर सिंह यांनी मेहनत, निवडणुकीच्या प्रचारात रात्रंदिवस काम करणे, घरोघरी जाऊन जनतेकडे मतं मागणे आणि प्रचारादरम्यान 'जैसा देश, वैसा भेस' या रणनीतीमुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर केला. 

Web Title: UP election 2024 BJP's Hindu candidate wins in Muslim-majority constituency; 11 Muslim candidates against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.