UP Election: भाजपाचा डबलगेम! यादव कुटुंब फोडले, पण अपर्णा यादवांना तिकिटच दिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 08:42 AM2022-02-02T08:42:23+5:302022-02-02T08:42:58+5:30

Uttar Pradesh Election 2022: अपर्णा यादव या लखनऊ कँटमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होत्या. 2017 च्या निवडणुकीत अपर्णा यादव यांनी या जागेवरून आपले नशीब आजमावले होते, परंतु रीटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता.

UP Election: BJP's double game! The Akhilesh, Mulayam singh Yadav family broke up, but Aparna Yadav was not got a ticket lucknow cantt | UP Election: भाजपाचा डबलगेम! यादव कुटुंब फोडले, पण अपर्णा यादवांना तिकिटच दिले नाही

UP Election: भाजपाचा डबलगेम! यादव कुटुंब फोडले, पण अपर्णा यादवांना तिकिटच दिले नाही

Next

सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादवांची सून अपर्णा यादवांना यादव कुटुंबापासून फोडण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपात प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही. लखनऊच्या कैंट विधानसभा मतदारसंघातून लढण्याची अपर्णा यांची इच्छा होती, गेल्या काही काळापासून त्या या मतदारसंघात राबतही होत्या, मात्र, जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा भाजपाने आपल्या मंत्र्यालाच उमेदवारी देऊन टाकली आहे. 

योगी सरकारमध्ये कायदे मंत्री असलेले बृजेश पाठक यांना भाजपाने लखनऊ कैंटमधून उतरविले आहे. ते गेल्यावेळी लखनऊ मध्यचे आमदार होते. अशा प्रकारे भाजपाने एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. प्रयागराजच्या भाजपा खासदार रीटा बहुगुणा जोशी यांच्या मुलाला देखील उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळ मयंक जोशी हे सपामध्ये जाण्याची शक्यता आहे. रीटा या दोनदा या मतदारसंघातून आमदार राहिलेल्या आहेत. 

अपर्णा यादव या लखनऊ कँटमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होत्या. 2017 च्या निवडणुकीत अपर्णा यादव यांनी या जागेवरून आपले नशीब आजमावले होते, परंतु रीटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. अशा स्थितीत भाजपच्या दोन्ही नेत्यांची मागणी फेटाळण्यात आली.

लखनौ कँट विधानसभा मतदारसंघातून २०१७ च्या निवडणुकीl भाजपने काँग्रेस सोडून पक्षात प्रवेश केलेल्या रीटा बहुगुणा जोशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, लोकसभेवर निवडून आल्यानंतर रिटा बहुगुणा जोशी यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 2019 मध्ये पोटनिवडणूक झाली ज्यात भाजपचे सुरेशचंद्र तिवारी विजयी झाले.

Web Title: UP Election: BJP's double game! The Akhilesh, Mulayam singh Yadav family broke up, but Aparna Yadav was not got a ticket lucknow cantt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.