UP assembly election 2022:  विजयाचा दावा करणाऱ्या ८० टक्के नेत्यांचं डिपॉझिट होतं जप्त, जाणून घ्या इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 09:49 AM2022-03-08T09:49:18+5:302022-03-08T09:50:00+5:30

UP assembly election 2022:  दोन महिन्यांपर्यंत चालणाऱ्या निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रत्येक पक्ष आणि नेता स्वत:च्या विजयाचा दावा करत असतो.

Up Election Security Deposit Of 80 Percent Of The Leaders Who Claim Victory Is Forfeited | UP assembly election 2022:  विजयाचा दावा करणाऱ्या ८० टक्के नेत्यांचं डिपॉझिट होतं जप्त, जाणून घ्या इतिहास...

UP assembly election 2022:  विजयाचा दावा करणाऱ्या ८० टक्के नेत्यांचं डिपॉझिट होतं जप्त, जाणून घ्या इतिहास...

Next

UP assembly election 2022:  दोन महिन्यांपर्यंत चालणाऱ्या निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रत्येक पक्ष आणि नेता स्वत:च्या विजयाचा दावा करत असतो. पण ज्यावेळी निकाल जाहीर होतात त्यावेळी वेगळच चित्र पाहायला मिळतं. १९८९ पासून ते अगदी २०१७ पर्यंत उत्तर प्रदेशात ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. त्याची आकडेवारी एकदा पाहिली असता यातील जवळपास ८० टक्के उमेदवारांवर थेट डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आल्याचं दिसून येतं. म्हणजेच फक्त २० टक्के उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचविण्यात यश मिळतं. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार उत्तर प्रदेशात मुख्यत्वे बहुतांश जागांवर केवळ दोन पक्षांमध्ये लढत पाहायला मिळते. त्यामुळे यावेळी डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवारांचा आकडा यावेळी वाढू शकतो. 

यूपीत किती जण आजमावताहेत नशीब
विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये एकूण ४४४१ उमेदवारांचं नशीब पणाला लागलं आहे. विशेष म्हणजे २०१७ साली यूपी निवडणुकीत ४८५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी फक्त चार मतदार संघ असे आहेत की जिथं एका मतदारसंघात १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी उमेदवारांचा आकडा गेल्या निवडणुकीपेक्षा कमी आहे. 

डिपॉझिट नेमकं किती?
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना ५ हजार रुपये डिपॉझिट भरावं लागतं. निवडणूक निकालात उमेदवाराच्या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी एक षष्ठांश मतं मिळाली तरच उमेदवाराला डिपॉझिट परत दिलं जातं. तसं न झाल्यास उमेदवाराला डिपॉझिट परत दिलं जात नाही. 

१९९३ मध्ये सर्वाधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
१९८९ पासून उत्तर प्रदेशात जितक्या विधानसभा निवडणूक झाल्या आहेत. त्यात १९९३ साली सर्वाधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. १९९३ मध्ये तब्बल ८८.९५ टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यावेळी एकूण ९७२६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातून ८६५२ जणांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. १९९६ साली ४४२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील ३२४४ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. 

२००२ मध्ये एकूण ५५३३ उमेदवार होते, त्यापैकी ४४२२ उमेदवार त्यांचं डिपॉझिट वाचविण्यात यशस्वी झाले. तसेच २००७ मध्ये ६०८६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ५०३४ उमेदवारांना डिपॉझिट वाचवता आलं नाही. २०१२ मध्ये एकूण ६८३९ उमेदवारांपैकी ५७६० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. २०१७ मध्येही असंच काहीसं घडलं होतं. त्यानंतर ४८५३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ३७३६ उमेदवारांना डिपॉझिट परत मिळवता आलं नव्हतं. 

Web Title: Up Election Security Deposit Of 80 Percent Of The Leaders Who Claim Victory Is Forfeited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.