अरे व्वा! शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी; केली दमदार कामगिरी, झाला मोठा अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:22 PM2023-03-02T15:22:34+5:302023-03-02T15:27:46+5:30
शेतकरी कुटुंबांची मुले बर्याचदा त्यांच्या मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर मोठं स्थान मिळवतात.
भारताची मोठी लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. देशातील कोट्यावधी लोक केवळ शेतीतून मिळणाऱ्या किरकोळ उत्पन्नाद्वारे जगतात. तथापि, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असूनही, शेतकरी कुटुंबांची मुले बर्याचदा त्यांच्या मेहनतीच्या, कष्टाच्या जोरावर मोठं स्थान मिळवतात. यशाच्या अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे.
शेतकऱ्याच्या लेकाने नेत्रदिपक भरारी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा असं या तरुणाचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील गौर डेव्हलपमेंट ब्लॉक येथील बेलवरिया जंगल गावात रहिवासी राम प्रकाश वर्मा यांचा जितेंद्र हा मुलगा आहे. फारच कमी सुविधा असूनही त्याने कठोर परिश्रमांच्या आधारे उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रेरणादाय़ी प्रवास जाणून घेऊया...
आपले हेतू चांगला असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर यश मिळतं. उत्तर प्रदेशातील शेतकर्याचा मुलगा जितेंद्र वर्मा याने हे योग्य असल्याचं सिद्ध केले आहे. त्याच्या जीवनाची गोष्ट लाखो लोकांसाठी प्रेरणादाय़ी आहे. कठोर संघर्ष करुन जितेंद्रने अभ्यास सुरू ठेवला आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता तो उत्तर प्रदेशच्या सचिवालयात अधिकारी म्हणून काम करणार आहे, यामुळे कुटुंबीयांना त्याचा अभिमान वाटत आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"