UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:45 PM2022-05-23T12:45:44+5:302022-05-23T12:47:35+5:30

Helicopter Taxi : उत्तर प्रदेश सरकारने मथुरा आणि आग्रा येथील हेलीपोर्टचे (Heliport) बांधकाम, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत.

up govt to start helicopter taxi in mathura and agra to connect tourism destinations | UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस

UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस

Next

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील पर्यटन स्थळांना हेलिकॉप्टर टॅक्सी सर्व्हिसद्वारे जोडण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे. लवकरच आग्रा ते मथुरा दरम्यान हेली टॅक्सी सुरू होऊ शकते. त्यामुळे पर्यटक आग्रा आणि मथुरा पर्यटन स्थळांदरम्यान हेलिकॉप्टरने प्रवास करू शकतात.

उत्तर प्रदेश सरकारने मथुरा आणि आग्रा येथील हेलीपोर्टचे (Heliport) बांधकाम, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत. या संदर्भात, सरकारने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, 31 मे रोजी दुपारी 12 वाजता लखनऊ येथील पर्यटन विभागाच्या कार्यालयात प्री-बिड (Pre-Bid) आयोजित केली जाणार आहे. तसेच, RFQs सबमिट करण्याची तारीख 23 जून निश्चित करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मथुरा आणि आग्रा हेलिपॅडचे बांधकाम पीपीपी (Public-Private Partnership) तत्त्वावर केले जाणार आहे. सर्वात कमी बोली लावणाऱ्याला हेलिपॅड बांधण्याबरोबरच ऑपरेशन आणि देखभालीचे काम दिले जाईल.

कंपन्या या वेबसाइटद्वारे करू शकतात अर्ज 
रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन (RFQs) साठी अर्ज आवश्यक शुल्कासह http://etender.up.nic.in वर 23 जून दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाइन सबमिट केले जाऊ शकतात. टेंडरमधील कोणत्याही बदलासंदर्भात माहिती असल्यास http://etender.up.nic.in आणि uptourism.gov.in या वेबसाइटवर माहिती दिली जाईल.

आग्रा ते मथुरा प्रवास काही मिनिटांत होईल पूर्ण 
हेलिकॉप्टर टॅक्सी सुरू झाल्यानंतर आग्रा ते मथुरादरम्यानचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार असून, पर्यटक एका दिवसात अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतील. यासोबतच पर्यटनाला चालना मिळणार आहे. याआधी पर्यटन विभागाने गोवर्धन परिक्रमेसाठी हेलिकॉप्टरचा वापर केला होता आणि जे पर्यटक फिरू शकत नव्हते, त्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास केला होता.

Web Title: up govt to start helicopter taxi in mathura and agra to connect tourism destinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.