9 तास वृद्ध महिलेचा मृतदेह चितेवर; मुलींचे संपत्तीसाठी भांडण, स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 02:45 PM2024-01-15T14:45:08+5:302024-01-15T14:46:06+5:30
या घटनेनंतर मुलींवर टीकेची झोड उठत आहे.
मथुरा: उत्तर प्रदेशातील मथुरेतून एक धक्कादायक आणि माणुसकिला काळिमा फासणारे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह चितेवर ठेवला होता, पण अग्नी देण्यापूर्वी त्या महिलेच्या मुलींमध्ये जमिनीच्या वाटणीवरुन स्मशानभूमीतच मोठा वाद झाला. प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.
8-9 तास मृतदेह चितेवर
मथुरेतील मसानी येथील स्मशानभूमीत ही मानवतेला लाजवेल अशी ही घटना घडली. 85 वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तीन मुलींमध्ये जमिनीच्या हक्कावरुन भांडण सुरू झाले. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सुमारे 8 ते 9 तास लागले. तेवढ्या वेळ त्या महिलेचा मृतदेह चितेवरच पडून होता. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेले पंडितही वैतागून परतले.
स्मशानभूमीत अनेक तास मुलींचा ड्रामा सुरा होता. अंत्यसंस्कारासाठी आलेली लोकही खोळंबली. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि पोलिसांच्या साक्षीनेच जमिनीचे लेखी वाटप करण्यात आले. या वाटपानंतर महिलेवर अंत्यसंस्कार पूर्ण झाले. मिथिलेश, सुनीता आणि शशी अशी या तीन मुलींची नावे असून, या तिघींवर गावातून आणि समाजातून टीकेची झोड उठत आहे.