पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:27 AM2024-05-23T08:27:54+5:302024-05-23T08:41:42+5:30
काही दिवसापूर्वी पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, या प्रकरणी पुणेकरांच्या संतापानंतर पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
काही दिवसापूर्वी पुण्यात पोर्शे कारचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, या प्रकरणी पुणेकरांच्या संतापानंतर पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, आता कानपूर पोलिसही अॅक्शनमोडवर आली आहे.कानपूरमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका अल्पवयीन मुलाने दोन मुलांना चिरडले होते, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली, मात्र पुढे अल्पवयीनाची सुटका करण्यात आली. गेल्या महिन्यातच आणखी एका अपघातात चार जणांना चिरडले. पुण्यातील घटना चर्चेत आल्यानंतर अखेर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
मागील वर्षी १५ वर्षीय मुलगा गाडी चालवत असताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पण त्या मुलावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान, काल बुधवारी त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्या मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी आणखी एक अपघात झाला होता. दोन्ही अपघात प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र बुधवारपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.
पुणे हिट अँड रन प्रकरण चर्चेत आल्यानंतरच कानपूर पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला अटक केली. या दोन्ही प्रकरणांमध्ये कानपूरमधील प्रख्यात डॉक्टर असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पहिला अपघात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाला होता, त्या ठिकाणी तो अल्पवयीन त्याच्या इतर तीन अल्पवयीन मित्रांसह गाडी चालवत होता. त्याने कार मॅगीच्या दुकानात घुसवली, त्यात सागर निषाद आणि आशिष राम चरण नावाच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
काही महिन्यांनंतर, ३१ मार्च २०२४ रोजी, आरोपीने पुन्हा चार जणांना गाडी चालवताना चिरडले या ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी त्याच्यावर भादंवि 279 आणि 338 कलम लावण्यात आले आहेत.
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बैठक घेतली होती. त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा बाल हक्क न्यायालयात अपिल करण्यात आली. त्यावर बाल हक्क न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पुणे अपघातप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला बालसुधारगृहात ठेवणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्या सुधारगृहात तो सज्ञान कि अज्ञान हे ठरणार आहे.