GPS झाले जुने, यूपी सरकार आणतंय GIS प्लॅटफॉर्म, प्रवाशांना मिळणार रस्त्यांची अचूक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 01:06 PM2022-10-11T13:06:34+5:302022-10-11T13:07:14+5:30
Geographic Information System : उत्तर प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (UP PWD) भौगोलिक माहिती प्रणालीवर (GIS) आधारित या प्लॅटफॉर्मद्वारे, रस्त्यांची योग्य माहिती उपलब्ध होईल
उत्तर प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम विभागाने (UP PWD) एक शानदार योजना तयार केली आहे. रस्त्यावर प्रवास करताना सुरक्षिततेसह सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System) आधारित प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना रस्त्याची खरी स्थिती कळणार आहे.
उत्तर प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (UP PWD) भौगोलिक माहिती प्रणालीवर (GIS) आधारित या प्लॅटफॉर्मद्वारे, रस्त्यांची योग्य माहिती उपलब्ध होईल. या प्लॅटफॉर्मवरून प्रवास सुरू करण्यापूर्वी युजर्सना रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल अचूक माहिती मिळू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) प्रधान सचिव नरेंद्र भूषण यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित प्लॅटफॉर्मचा वापर अंतर्गत कार्यांसाठी केला जात आहे, जसे की सिस्टमवरील माहिती खर्च मेट्रिक्ससह अपडेट करणे, इंटरनेट युजर्ससाठी नेव्हिगेशन पॅनेल प्रदान करणे इत्यादी... यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन लाख किलोमीटरचे रस्त्यांचे नेटवर्क असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य महामार्ग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या इतर रस्त्यांच्या 55,000 किमीची माहिती एकत्र करत आहे, असे नरेंद्र भूषण यांनी सांगितले.
मूल्यमापन सॉफ्टवेअर प्रणाली 'प्रहरी' सुरू
कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी विभागामार्फत 'प्रहरी' ही तांत्रिक बोली मूल्यमापन सॉफ्टवेअर प्रणाली सुरू करण्यात आली आहे. "ए, बी, सी आणि डी गटांतर्गत सर्व कॉन्ट्रॅक्टर कॅटगरीला दोन वर्षांपूर्वी लाँच केलेल्या सॉफ्टवेअरच्या महत्त्वाबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे," अधिकाऱ्यांने सांगितले. सॉफ्टवेअर आणण्यापूर्वी कॉन्ट्रॅक्टरनी दिलेल्या तांत्रिक बोलीचे मॅन्युअली मूल्यमापन करण्यात आले होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पक्षपाताच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. प्रहरीने केवळ वैज्ञानिक मूल्यमापन पद्धती आणली नाही तर ही प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण केली जाईल आणि सर्वात योग्य बोलीदार निवडला जाईल याचीही खात्री केली.