बेडवर 500च्या नोटांचे बंडल अन् SO च्या कुटुंबाचा PHOTO..; कुठून आला एवढा पैसा? मिळालं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 01:35 AM2023-06-30T01:35:10+5:302023-06-30T01:45:36+5:30
ही रक्कम जवळपास 14 लाख रुपये एवढी असल्याचे बोलले जात आहे. एसपींनी या प्रकरणाची चौकशी सीओ बांगरमऊ यांच्याकडे सोपवली आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एक फोटो व्हायरल होताच पोलीस दलात खळबळ उडाली. हा फोटो बेहटा मुजावर पोलीस ठाण्याच्या SO च्या घरातील आहे. यात त्यांची मुले आणि पत्नी 500 च्या नोट्यांच्या 27 बंडलसह दिसत आहेत. ही रक्कम जवळपास 14 लाख रुपये एवढी असल्याचे बोलले जात आहे. एसपींनी या प्रकरणाची चौकशी सीओ बांगरमऊ यांच्याकडे सोपवली आहे.
बेहटा मुजावर पोलीस ठाण्याचे प्रमुख रामेश चंद्र साहनी यांच्या कुटुंबाचा एक फोटो गुरुवारी लाखो रुपयांच्या नोटांसह सोशल मिडियावर व्हायरल झाला. यात, एका बेडवर 500 च्या नोटांचे 27 बंडल आणि त्यांची मुलं व पत्नी दिसत आहेत. एवढेच नाही, तर या फोटोत त्यांची मुलं नोटांच्या बंडलसह आनंदाने सेल्फी घेतानाही दिसत आहेत. हा फोटो व्हायरल होताच पोलीसदलात खळबळ उडाली. तसेच, प्रकरणाची माहिती मिळताच एसपी सिद्धार्थ शंकर मीणा यांनी प्रकरणाची चौकशी लावली आहे.
कौटुंबीक मालमत्तेची करण्यात आली होती विक्री - साहनी -
या संदर्भात बोलताना रमेश साहनी म्हणाले, ऐका कौटुंबीक प्रॉपर्टीची विक्री झाली होती. हा फोटो 14 नोव्हेंबर 2021 चा आहे. मात्र, या व्हायरलं फोटोच्या चौकशीसंदर्भात सीओ बांगरमऊ यांना आदेश देण्यात आले आहेत.
याप्रकरणी बोलताना बांगरमऊचे सीओ पंकज कुमार सिंह म्हणाले, बेहटा मुजावर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांच्या कुटंबाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांची पत्नी आणि मुले नोटांच्या बंडलसह दिसत आहेत. हे गांभीर्याने घेत प्रकरणाची चौकशी केली जात आहे.