आधार अपडेट करणे होणार सोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:10 AM2020-04-28T04:10:55+5:302020-04-28T04:11:19+5:30

सीएससीकडून २० हजार बिझनेस करस्पाँडंटकडून (बीसी) ग्रामीण भागात सुविधा देण्यात येत आहेत.

Updating support will be easy | आधार अपडेट करणे होणार सोपे

आधार अपडेट करणे होणार सोपे

Next

नवी दिल्ली : आधार अपग्रेड करू इच्छिणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. यूआयडीएआयने ग्रामीण भागात राहणाºया लोकांना आधार अपडेशन करण्यासाठी आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयांतर्गत एका कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) परवानगी दिली आहे. सीएससीकडून २० हजार बिझनेस करस्पाँडंटकडून (बीसी) ग्रामीण भागात सुविधा देण्यात येत आहेत.
केंद्रीय दूरसंचार आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी टष्ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला विश्वास आहे की, ही सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देणारी ठरेल. आधार सेवा त्यांच्या निवासस्थानाजवळ आणण्यास यामुळे मदत होईल. सीएससीचे सीईओ डॉ. दिनेश त्यागी यांनी सर्व बिझनेस करस्पाँडंट यांना सांगितले आहे की, त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण त्वरित पूर्ण करावे. न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर २०१८ मध्ये सीएससीच्या माध्यमातून होणारे आधारचे काम बंद करण्यात आले होते. तेव्हापासून सीएससींतर्गत काम करणाºया ३.५ लाखांपेक्षा अधिक ग्रामीण स्तरातील उद्योजकांकडून (व्हीएलई) आधारचे काम सुरू करण्याची मागणी होत होती. कारण, त्यांनी आधार कीटमध्ये गुंतवणूक केली आहे आणि सीएससीने त्यांना प्रशिक्षित केले आहे. आधार अपडेशन काम पुन्हा सुरू करीत असल्याबाबत डॉ. त्यागी यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांचे आभार मानले आहेत.


यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया लक्ष्यप्राप्तीला मजबुती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सीएससीच्या माध्यमातून २० कोटींपेक्षा अधिक आधार तयार करण्यात आलेले आहेत.

Web Title: Updating support will be easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.