नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत उपेंद्र कुशवाह यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 03:01 PM2018-12-10T15:01:24+5:302018-12-10T15:02:37+5:30
बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
नवी दिल्ली - बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहेत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत काहीही काम झालेले नाही. बिहार जिखे होते तिथेच आजही आहे, अशी टीका कुशवाहा यांनी केली.'' कुशवाह हे मोदी सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळत होते.
यावेळी एनडीएमध्ये होत असलेली आपली घुसमटही स्पष्टपणे बोलून दाखवली. ''एनडीएमधील माझा अनुभव अत्यंत वाईट आहे. बिहारमधील जनतेला न्याय मिळावा यासाठी मी एनडीएच्या बैठकीत माझे मत वारंवार मांडले. मात्र नितीश कुमार बिहारी जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत, असे भाजपाकडून सांगण्यात येत होते.'' असे कुशवाह म्हणाले. तसेच राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, मला आणि माझ्या पक्षाला संपवणे हाच त्यांच्या अजेंडा आहे, तसेच हे काम भाजपाने सुरू केले आहे. असा आरोप कुशवाह यांनी केला.
RLSP Chief Upendra Kushwaha: Koshish inki (BJP) nirantar rahi hamari party ko barbad karne ka,Nitish ji ki alag koshish rahi aur dono mil gaye.Nitish ji ke saath khade huye BJP ke log,aur mera apmaan shuru ho gaya.Nitish ji ne saarvjanik roop se mujhe neech keh ke sambodhit kiya. pic.twitter.com/PjdvP18RnA
— ANI (@ANI) December 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी या पक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपाकडून त्या मागणीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे कुशवाहा गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे एनडीएला सोडचिठ्ठी देऊन विरोधी पक्षांच्या आज होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
RLSP Chief Upendra Kushwaha: After observing everything I feel I shouldn't have stayed in the cabinet even for a minute to implement RSS agenda. So I tendered my resignation as the Union Minister & I've also decided that Rashtriya Lok Samta Party will no longer be a part of NDA. pic.twitter.com/bOVxQLZNUw
— ANI (@ANI) December 10, 2018
दरम्यान, उपेंद्र कुशवाहा हे आपला राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) हा पक्ष शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दल या या पक्षाल विलीन करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे कुशवाहा यांच्या पक्षातील अनेक नेते जेडीयूच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.