मध्यरात्री काशीतील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी निघाले पंतप्रधान मोदी; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 08:33 AM2024-02-23T08:33:21+5:302024-02-23T08:33:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री गुजरातहून थेट आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री गुजरातहून थेट आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले. येथे आज ते अनेक विकास प्रकल्पांची सुरुवात करणार आहेत. नरेंद्र मोदी जेव्हा बाबपूर विमानतळावर उतरले तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे भाजपाचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
नरेंद्र मोदींचा ताफा बनारस लोकोमोटिव्ह वर्कशॉपच्या अतिथीगृहाकडे निघाला तेव्हा त्यांच्या वाहनांचा ताफा काशातील शिवपूर-फुलवारिया-लहारतारा रस्त्यावर थांबला, तेथून नरेंद्र मोदींनी चौपदरीकरणाची पाहणी केली. नरेंद्र मोदींसोबत योगी आदित्यनाथही उपस्थित होते. काही वेळ रस्त्यावर फेरफटका मारल्यानंतर नरेंद्र मोदी रात्री बीएलडब्ल्यू गेस्ट हाऊसकडे रवाना झाले.
नरेंद्र मोदींनी पाहणी केलेल्या चौपदरी पुलाचे नुकतेच उद्घाटन झाले. त्यामुळे शहराच्या दक्षिण भागात राहणाऱ्या लोकांची मोठी सोय झाली आहे. खुद्द नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
Upon landing in Kashi, inspected the Shivpur-Phulwaria-Lahartara Marg. This project was inaugurated recently and has been greatly helpful to people in the southern part of the city. pic.twitter.com/9W0YkaBdLX
— Narendra Modi (@narendramodi) February 22, 2024
पंतप्रधान मोदींचा आजचा कार्यक्रम काय?
वाराणसीतील बनास डेअरी काशी कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. याशिवाय रविदास जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमातही संत सहभागी होणार आहेत. या वेळी संत रविदासांच्या पुतळ्याचे, संग्रहालयाचे आणि उद्यानाचे भूमिपूजनही होणार आहे.