कडक सॅल्यूट! लेकीसह ऑफिसची जबाबदारी सांभाळली, UPPSC उत्तीर्ण झाली, 'असा' होता प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 05:56 PM2022-11-22T17:56:41+5:302022-11-22T18:05:56+5:30
अलका शर्मा यूपीपीएससी 2017 मध्ये प्री क्वालिफाय झाल्या होत्या. पण त्य़ा मेन क्लिअर करू शकल्या नाहीत.
शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षणानंतर सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. अधिकारी होण्याच्या इच्छेने दरवर्षी लाखो उमेदवार UPPSC च्या भरतीसाठी अर्ज करतात. पण यशस्वी उमेदवारांची संख्या थोडीच असते. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. लेकीसह ऑफिसची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत ती UPPSC उत्तीर्ण झाल्याची घटना समोर आली आहे. अलका शर्मा असं या महिलेचं नाव आहे.
अलका शर्मा यांनी UPPSC 2020 क्लियर केली आहे. याआधी, अलका यूपीमधील बेसिक एज्युकेशन डिपार्टमेंट ज्युनियर स्कूलमध्ये शिक्षिका या पदावर कार्यरत होत्या. आता त्यांची डाएटमध्ये सीनियर स्पोकपर्सन पदासाठी निवड झाली आहे. अलका यांच्यासाठी इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं, कारण अलका शर्मा यांना एक मुलगी आहे जिच्यासोबत त्यांना त्यांची शाळाही सांभाळायची आहे. हे सर्व सांभाळण्यासोबतच त्यांनी वेळ काढून यूपीपीएससीचा अभ्यासही केला.
अलका यांनी दिलेल्या माहितीनुसार, किती तास अभ्यास केला हे कधी मोजलं नाही, पण हो, त्य़ांनी सतत अभ्यास केला. यापूर्वी अलका शर्मा यूपीपीएससी 2017 मध्ये प्री क्वालिफाय झाल्या होत्या. पण त्य़ा मेन क्लिअर करू शकल्या नाहीत. एवढेच नाही तर अलका यांना यानंतर आणखी एक धक्का बसला. कारण यानंतर यूपीपीएससी परीक्षेचा पॅटर्नच बदलला. त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आणि UPPSC 2020 मध्ये त्याची सीनियर स्पोकपर्सन म्हणून निवड झाली.
अलका यांचं 2013 साली लग्न झाले होते. अलका यांची मुलगी त्यांच्यासाठी लकी ठरली आहे. मुलगी झाल्यावरच त्यांना पहिली नोकरी मिळाली. त्यांचा शिक्षण गावीच झालं आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर अलका यांनी अयोध्या येथील साकेत कॉलेजमधून बीएससी आणि बॉटनीमधून एमएससी केले. यानंतर त्यांनी बीएड आणि नंतर एम.एड केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"